खेळ खेळाडूमहाराष्ट्र
Trending

शिक्षण प्रसारक मंडळीत योग दिन उत्साहात साजरा

शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे स. प महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड एस. के. जैन व क्रिडा समीतीचे अध्यक्ष  केशव वझे
यांच्या मनोगताने झाली
 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय योग पटू सुनील रोट्टी सर उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती बॉक्सिंग ळातील अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री मनोज पिंगळे , संस्थेचे क्रीडा समिती अध्यक्ष श्री केशव वझे सर , प्रभुदेसाई सर , पराग ठाकूर, कालकर  , राजेंद्र पटवर्धन  ,राधीका इनामदार , अष्टेकर  यांचे मार्गर्शन लाभले. आकांक्षा खराडे या योगपटुने प्रात्याक्षीके केली
स. प . महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सविता दातार  व महाविद्यालयातील उपप्राचार्य, शिक्षक व महाविद्यालयातील कार्यक्रमास उपस्थित होते.शारीरिक शिक्षण संचालक श्री रणजीत चामले यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुणे , निगडी , चिपळुण , मुंबई , सोलापुर यथील सर्व नियामक मंडळाचे सर्व सदस्य, शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी ,शिक्षक , पालक या कार्यक्रमा मधे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते..

व सुमारे ३००० हून अधिक लोकांनी यूट्यूब, झूम प्लॅटफॉर्म व फेसबुक द्वारे सहभाग दर्शवला.या कार्यक्रमाची सांगता संस्थेच्या 21000 विद्यार्थी, स्टाफ पालक सर्वांनी मिळुन १० कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला श्री मिहीर प्रभुदेसाई यांनी संकल्प आणी आभार प्रकट केले ..सदर कार्यक्रमाच्या आयोजन शि प्र मंडळी क्रिडा समितीने केले

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close