पुणे
Trending

भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ शशिकांत ज्ञानोबा सातव , I.P.S अधिकारी अश्विनी शशिकांत सातव यांची पेरिविंकल स्कूल ला सदिच्छा भेट

भारतीय हवामान खात्याचे संशोधक शशिकांत ज्ञानोबा सातव आणि I.P.S.अधिकारी अश्विनी शशिकांत सातव यांनी पेरिविंकल स्कूल ला सदिच्छा भेट दिली. यावेळी शशिकांत सातव यांनी त्यांच्या अंटार्टिका येतील संशोधन मोहिमेचे रोमांचक असे अनुभव सांगितले. तसेच महाराष्ट्रातील या I.P.S कन्येने गुजरात येथेही पोस्टिंग घेऊन तेथेही ठळक असा ठसा उमटवला. विविध इन्वेस्टिगेशन मिशन चे विविध अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.
बावधन येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल चा परिसर व शालेय रचना बघून ग्रामीण भागात अशी विकसित शाळा बघून शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला व पेरिविंकल इंग्लिश मिङियम शाळेतील दर्जेदार शिक्षणातून असे अनेक IPS ,IAS ऑफिसर्स या शाळेतून घडोत अशा सदिच्छा व्यक्त केल्या. शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, रुचीरा खानविलकर व निर्मल पंडीत यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक हे एक सक्षम पिढी घडवण्याचे खूप मोठे व जबाबदारीचे कार्य करताय याचा खूप अभिमान आहे असे सांगितले. श्री शशिकांत सातव हे भारताच्या वतीने दोन वेळा पुणे अंटार्टिका च्या मोहिमेवर यशस्वीपणे जाऊन आले आहेत. हवामान खात्याच्या अंटार्टिका संशोधन मोहिमेमध्ये त्यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. अंटार्टिका वरील अनेक रहस्यांचा उलगडा यावेळी झाला.ग्लोबल वॉर्मिंग सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे तसेच अंटार्टिका वरील बर्फ ही मोठ्या प्रमाणात वितळत आहे असेही त्यांनी सांगितले.
ऑफलाईन स्कूल सुरू झाल्यानंतर शशिकांत सातव यांचे व्याख्यान व अन्टर्टिका मोहिमेचे गूढ प्रत्यक्ष थेट विद्यार्थ्याना उलगडून सांगण्याची संधी लवकरच उपलब्ध होईल यात तिळमात्र ही शंका नाही.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close