
संजय दुधाणे
महावार्ता न्यूज: टोकीयो ऑलिम्पिकसाठी पात्र झालेला मराठमोळा तिरंदाज प्रवीण जाधव (Archer Pravin Jadhav) याच्या संघर्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दखल घेतली आहे. ‘मन की बात’ या देशाला उद्देशून केलेल्या कार्यक्रमात त्यांनी या संघर्षाचा उल्लेख केला.
प्रवीण सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतो. तो एक महान तिरंदाज आहे. त्याचे आई-वडील मजुरी करुन कुटुंब चालवतात. त्यांचा मुलगा आता टोकियो ऑलिम्पिकला जात आहे. ही फक्त त्याच्या आई-वडिलांसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे,” या शब्दात पंतप्रधान मोदींनी त्याचा गौरव केला आहे
Share