महाराष्ट्र
Trending
नवा मुळशी पॅटर्न – सौ दिन का सरपंच, हिंजवडीत 100 दिवसांत दुसरा सरपंच, वर्षभरात 4 सरपंचांची होणार निवड

महावार्ता न्यूज ः गावाच्या विकासासठी 5 वर्ष एकच सरपंच असावा तो ही सर्व गावाने निवडून दिलेला हा युती सरकरचा निर्णय रद्द झाल्याने अनेक गावात वर्षात दोनपेक्षा अधिक सरपंचपदाचे पीक पुन्हा उगवू लागले आहेत. मुळशीतील हिंजवडी गावाने 100 दिवसांत दुसरा सरपंच तर वर्षभरात 4 सरंपच असा नवा मुळशी पॅटर्न राबविला आहे. नुकतीच हिंजवडीच्या सरपंचपदी विक्रम वसंत साखरे यांची निवड झाली आहे. यानंतर सौ दिन का सरपंच या अजब फॉमूर्ल्याची चर्चा मुळशीत नव्हे तर राज्यात रंगू लागली आहे.
हिंजवडीत म्हातोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे वर्चस्व असून गाव महानगरपालिकेत जाण्याच्या समज-गैरसमजातून 3-3 महिन्याचा सरपंच व उपसरंपच पदाचा फॉमूला पॅनेल प्रमुखांनी ठरविला आहे.नव्याने निवड झालेले विक्रम वसंत साखरे हे एक युवा सरपंच म्हणून पुढे आले आहेत. मात्र 100 दिवसांत नेमका काय विकास करणार हा प्रश्न त्यांना मते दिलेल्या सुशिक्षित मतदारांसमोर आहे. हिंजवडीत एकही उद्यान नाही, खेळण्यास क्रीडागंण नाही, स्वच्छतेचा अभाव, पाणी प्रश्नही डोके वर काढत आहे. या मूलभूत प्रश्नांकडे हिंजवडी नगरीचे दुसरे सरपंच कितपत लक्ष घालणार हा मोठा सवाल आहे.
पातोडा या आदर्श गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे हे गेली 20 वर्ष सरपंंच होते, ते म्हणतात अजून मला सरपंच पदाची महती समजली नाही. अजूनही कामे बाकी आहेत. सध्या 3 महिन्याचे सरंपच कसे काम करतात हे मला न उमजणारे कोडे आहे. सरपंच ही जबाबदारी असते केवळ मिरवून घेण्याची उपाधी नाही…
नव्याने निवड झालेले विक्रम वसंत साखरे हे एक युवा सरपंच म्हणून पुढे आले आहेत. मात्र 100 दिवसांत नेमका काय विकास करणार हा प्रश्न त्यांना मते दिलेल्या सुशिक्षित मतदारांसमोर आहे. हिंजवडीत एकही उद्यान नाही, खेळण्यास क्रीडागंण नाही, स्वच्छतेचा अभाव, पाणी प्रश्नही डोके वर काढत आहे. या मूलभूत प्रश्नांकडे हिंजवडी नगरीचे दुसरे सरपंच कितपत लक्ष घालणार हा मोठा सवाल आहे.
हिंजवडीत सरपंचपदी विक्रम वसंत साखरे यांची निवड
बातमीसाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
Share