पुणे
Trending

निम्मी मुळशी कोरोनाग्रस्त, 48 गावात कोरोनारूग्ण, एकण रूग्ण 260, कोणत्या गावात आहे अजून कोरोना, वाचा महावार्तावर…

महावार्ता न्यूज ः लसीकरणाचा वेग मंदविल्याने निम्मा मुळशी तालुका जून अखेर कोरोनाग्रस्त झाला असून 48 गावात 260 पेक्षा अधिक कोरोना रूग्ण उपचार घेत आहे.
कोव्हिड 19 ची दुसरी लाट ओसरत असताना भरे, कासारअंबोली, दारवली, मारूंजी, बावधन, पिरंगुट ही गावे अजूनही हॉट स्पॉट असल्याने तालुक्यात कडक निर्बंध पाळावे लागणार आहे. हिंजवडी व भूगांव गावातील रूग्णसंख्या वेगाने कमी झाली असून सर्वाधिक 33 रूग्ण माण गावात आहेत.
मुळशीत रूग्णसंख्या कमी झाली असली तरी रोज सरासरी 20 नवे रूग्ण आढळून येत आहे. रूग्ण कमी झाल्याने बावधन, कासारअंबोली येथील कोव्हिड सेंटर बंद करण्यात आले असून सध्या हिंंजवडी व पौड येथे उपचार सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांत 18824 रूग्ण मुळशीत आढळले असून 18331 बरे झाले आहेत. यापैकी 234 जण मृत्यू झाले आहेत.

या गावात अजून आहे कोरोनाग्रस्त

मुळशी – 1
वडगाव – 2
आंबवणे- 2
विसाघर- 2
देवघर – 1
चांदिवली – 2
आंदेशे – 2
अंबडवेट – 9
भरे – 20
दारवली – 16
कासारअंबोली – 25
चाले – 3
नांदगाव- 1
साठेसाई – 1
जामगांव – 3
खुबवली – 2
संभवे – 2
रावडे – 5
करमोळी -1
कोळवण – 1
होतले – 1
माण – 13
चांदे – 7
घोटावडे – 5
मुलखेड – 3
हिंजवडी – 6
कातरखडक – 1
जांबे – 4
मारूंजी – 33
कासारसाई – 11
नेरे – 15
जवळ – 2
आंधळे – 2
रिहे – 1
आंदगाव – 1
बावधन – 29
भूगांव – 2
भुकूम – 5
लवळे – 9
दासवे – 1
डावजे – 1
सूस – 10
म्हाळूंगे – 1
नांदे – 3
पिरंगुट – 18
उरवडे – 4

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close