पुणे
Trending
मुळशीत युवक काँग्रेसकडून गरजूंना छत्री वाटप, आमदार थोपटेंनी केले सुहास भोते यांच्या उपक्रमाचे कौतुक

महावार्ता न्यूज: मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.उपसरपंच सुसगांव सुहास सुदाम भोते यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळुन मुळशी तालुक्यामध्ये गरजूंना छत्री वाटपाचा शुभारंभ भोर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार संग्राम दादा थोपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
आमदार संग्राम थोपटे यांनी सुहास भोते यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे या वेळी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, राजगड साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके, मुळशी कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, मावळ तालुका युवक काँग्रेसचे मा.अध्यक्ष गणेश काजळे, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव, मुळशी तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष अमित जांभुळकर, युवा उद्योजक रोहिदास भोते, एकनाथ खोले, अविनाश शिंदे, गणेश पवळे, शंकर बताले, उज्वल ववले, गणेश कंधारे, विक्रम पवळे या प्रसंगी आदी मान्यवर उपस्थित होते
Share