महाराष्ट्र
Trending

मुळशीचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक धुमाळांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हस्ते विशेष पदकाचे गौरव

महावार्ता न्यूज ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या वतीने विशेष राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवित करण्यात आले. कायदा सुव्यवस्था क्षेत्रात सतत 15 वर्ष उत्तम सेवा केल्याबद्दल धुमाळ यांचा गौरव करण्यात आला.
 उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण जिल्हा मुख्यालयाच्या आवारामध्ये पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या बाणेर रोड व पाषाण रोड येथील दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मान पदक प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, अशोक धुमाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस हवालदार संतोष बगाड व पोलीस शिपाई सुलतान डांगे यांचा समावेश आहे.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, मिलिंद मोहिते, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक पी.एस. रवी यांच्या सह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.
़़
गेली दोन वर्ष मुळशी तालुक्यात आपले कर्तव्य बजाविताना पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी कायदा सुव्यवस्था राखली आहे. दोन वर्षाच्या काळात मुळशी तालुक्यात सहा गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावत पन्नास पेक्षा जास्त समाजात दहशत असलेल्या गुन्हेगारांना जेलमध्ये पाठविले असून कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्यावरही नुकत्याच झालेल्या प्रतिबंधक कारवाईमध्ये अशोक धुमाळ यांनी महत्त्वाची भुमिका बजावली असून मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल मुळशी तालुक्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय –

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

‘कोरोना’ विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले.  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल नेहमीच तत्पर असते.  कोरोनाचे संकट परतवण्यासाठी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून पालन व्हावे या करीता प्रयत्न करीत असतात. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास दंड वसुलीची गरज पडणार नाही.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close