
महावार्ता न्यूज : कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना रविवारी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सावंत यांच्या या पुरस्काराने मुळशीतील हिंजवडी पोलिस स्टेशनची शान उंचावली आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण भवन येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोरोना काळात स्वताच्या जीवाची बाजी लावत इतरांचे जीव वाचविणाऱ्या कोरोना योध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी मुंबई येथे करण्यात आले होते. त्यामध्ये खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीसनिरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची निवड करण्यात आली होती.
मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचा
उद्रेक झाला होता. अनेक ठिकाणी बेड
आणि ऑक्शिजनचा तुटवडा होता. त्याच दरम्यान हिंजवडी येथील एका हॉस्पिटलमध्ये ऑक्शिजन सिलेंडर संपले होते. २५ रुग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच वेळी देवदूत म्हणून धावून येत सावंत यांनी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मदतीने तत्काळ सिलेंडर उपलब्ध करून दिल्याने२५ रुग्णांना जीवदान मिळाले होते. याच कार्याची प्रामुख्याने दखल घेत पत्रकार
संघाने सावंत यांची सत्कार मूर्ती म्हणून
निवड केली आहे.
सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्याला चाप बसला असून व्हाईट कॉलर गुन्हेगार आणि लैंड माफियाला लगाम बसला आहे. सर्वात मोठ्या धाडशी कारवाया सावंत यांनी केल्या आहेत. ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना सोबत घेवून ठाण्याचा कारभार अतिशय योग्य रित्या चालविण्यात सावंत यांना यश आले आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये सलोखा तयार केल्याने पोलिसांबद्धलचा आदर अधिकच वाढला आहे. खऱ्या अर्थाने पोलीस हे नागरिकांचे मित्र आहेत हे आपण नुसते ऐकत होतो परंतु सावंत यांच्यामुळे “पोलीसमित्र’ हि संकल्पना प्रत्यक्षात नागरिकांनी अनुभवली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
Share