ताज्या बातम्या
Trending

हिंजवडीत लसीकरणाचा खेळखंडोबा, शासकीय लशीवर ग्रांमपंचायतीचा डल्ला, ग्रामस्थांनी फ्लेक्सव्दारे नोंदविला निषेध

महावार्ता न्यूज : सौ दिन का सरपंचची फ्लेक्सबाजी सुरू असतानाच सोमवारी हिंजवडीत कोणी लस देता का लस हा फ्लेक्स चर्चेत आला. यामुळे हिंजवडीतील लसीकरणाचे खेळखंडोबा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड लसीकरण वेगाने व्हावे म्हणून हिंजवडी ग्रामपंचयातीच्या इमारतीत प्राथमिक उपकेंद्राच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र या लसीकरण मोहिमेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे.

हिंजवडी ग्रामपंचायतीच्या आवारात ‘कुणी लस देता का लस’ अशा आशयाचे फ्लेक्स लावल्यामुळे येथे होणाऱ्या लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘हिंजवडीत लसीकरणासाठी गर्दी, नियोजनाचा अभाव’ असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तासन तास  ताटकळत  रांगेत उभे राहावे लागत आहे.
दरम्यान लसीकरणासाठी कोऱ्या फॉर्मवर ‘ग्रामपंचायत हिंजवडी’ चा शिक्का मारून पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांच्या च मर्जीतील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असल्याचे फ्लेक्सवर नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे हिंजवडीत सुरू केलेले  लसीकरण केंद्र नेमकं आरोग्य विभागाचे ग्रामपंचायत चे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत हिंजवडी ग्रामविकास युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विलास साखरे यांनी एक पत्रक काढून ग्रामपंचायतीचा लसीकरणातील हस्तक्षेप थांबविण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले ग्रामपंचायत च्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी लसीकरणात हस्तक्षेप करू नये. लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये .

गावात लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी नवनियुक्त सरपंच विक्रम साखरे यांनी सरपंच पद मिळवण्या पूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे घातले होते. व त्यानुसार लसीकरण केंद्रा चे उदघाटन करून गावात मोठा गाजावाजा देखील केला होता. मात्र अवघ्या दहा पंधरा दिवसाच्या आतच हे लसीकरण केंद्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.  लसीकरणाच्या फ्लेक्स बाजीमुळे हिंजवडी गावातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close