महाराष्ट्र
Trending
लोकमतच्या रक्तदानासाठी मोहिमेसाठी मुळशीकरांचा उत्साही प्रतिसाद, रविवारी 11 जुलै पिरंगुटमध्ये भव्य शिबिराचे आयोजन
दै. लोकमत, आबासाहेब शेळके मित्रमंडळ व श्री शिवसमर्थ बचत गटाच्या संयुक्त आयोजन

महावार्ता न्यूज ः दै. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमतने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलेल्या रक्तदान मोहिमेत नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुळशी तालुक्यातही दै. लोकमत, आबासाहेब शेळके मित्रमंडळ व श्री शिवसमर्थ बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ११ जुलै २०२१ रोजी पिरंगुट येथील सुदर्शन विद्यामंदिर शाळेत सकाळी ९ ते ५ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराची पूर्व तयारी जोरात सुरू असून ,आयोजकांमार्फत गावोगावी जाऊन संपर्क सुरू केला आहे. या संपर्कप्रसंगी तालुक्यातील विविध संस्था, संघटना, गणेश मंडळे, व्यायामशाळा यांचा उत्साही प्रतिसाद मिळत आहे. शिबिराच्या नियोजनाकरिता दैनिक लोकमतचे प्रतिनिधी दिपक मुनोत, अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन शाळेत नुकतीच एक नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी विविध संस्था व संघटना चे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पौड, पिरंगुट, उरावडे, लवळे, घोटावडे,भरे येथे गणेश मंडळे ,ग्रामपंचायत यांच्याबरोबर संपर्क करण्यात आला. यावेळी उपस्थित तरुणांनी मुळशी तालुक्यातून सर्वाधिक रक्तदान करण्याचा संकल्प केला.
मुळशीकर मोठ्या संख्येने रक्तदान करणार
दै. लोकमतच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरासाठी मुळशी तालुका एकवटला असून जिल्ह्यातील विक्रमी रक्तदान मुळशीत होईल. सामाजिक जाणिव राखत लोकमतने राबविलेल्या उपक्रमाला मुळशीत प्रतिसाद मिळत असून ऑनलाईल फॉर्मव्दारे रक्तदान नोंदणी करण्यात येत आहे.
– आबा शेळके, शिवसेना नेते, मुळशी
या रक्तदान शिबिराच्या नियोजनाकरिता रा.स्व. संघ सेवविभाग, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था, मुळशी इंडस्ट्रीयल असोसीएशन, लुपिन फौंडेशन, प्रभा इंजिनिअरिंग, शिवराय प्रतिष्ठान,शिवप्रतिष्ठान, सुदर्शन विद्यामंदिर शाळा, बजरंग दल,श्रीमंत कासार पाटील मित्रमंडळकासार आंबोली, ग्रामविकास प्रतिष्ठान कासारआंबोली, बालवीर युवक मंडळ, सर्वज्ञ विकास प्रबोधिनी ,पिरंगुट व घोटावडे ग्रामपंचाय,पुणे सर्जिकल लॅब, आयबीपी रक्त पेढी, तसेच तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे आणि राजकीय पक्षांचे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या शिबिरात तयारी अंतिम टप्प्यात असून तालुक्यातील अधिकाधिक रक्तदात्यांनी आपली पूर्व नोंदणी करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पूर्व नोंदणी
Share