पुणे
Trending
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले पेरिविंकल स्कूलचे अन् राजेंद्र बांदल यांच्या कार्याचे कौतुक

महावार्ता न्यूज : महाराष्ट्र पोलिस दलाचे आर्यनमॅन पोलिस आयुक्त यांनी मुळशीतील पेरिविंकल शाळेस आज भेट देऊन संस्थेचे व संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या कार्याचे कौतुक केले.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या बावधन, सूस व पिरंगुट या सर्व शाखांच्या इ. 10वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ बावधन शाखेत संपन्न झाला. या प्रसंगी पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुण्य नगरीच्या उपमहापौर सौ सुनीता वाडेकर , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल संचालिका सौ रेखा बांदल, हेमंत निंबाळकर, अँड. जगदीश बेंडखळे, पंकज महाराज गावडे, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे, विनोद मझीरे, कांबळे तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक सौ नीलिमा व्यवहारे, अभिजित टकले,सौ निर्मल पंडित, रुचीरा खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तब्बल 45 मिनिटे विद्यार्थ्यांची संवाद साधून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या प्रेरणादायी भाषणात ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे व प्रत्येकात गुण दडलेले आहेत फक्त ओळखता आले पाहिजे.हिरा कुठेही चमकतो तसेच माणूस मनापासून ठरवले तर सगळ करू शकतो. फक्त आयुष्यात आपले ध्येय निश्चित करून त्यप्रमाणे वाटचाल केली की कुठलीच गोष्ट अवघड नसते असे प्रगल्भ विचार विद्यार्थ्याना सांगितले. काच हिरा व त्यांचे पैलू, व्यक्तीची अमूल्य किंमत याबाबतच्या त्यांनी सांगितलेल्या कथा नक्कीच स्मरणात राहतील. त्यांच्या स्वानुभवातून आलेले हे स्फूर्तीदायक विचार विद्यार्थ्याना नक्कीच प्रेरणा देऊन जातील.

पुण्याच्या उपमहापौर सौ सुनीता वाडेकर यांनी देखील त्यांचे अनुभव व शालेय जीवनातील प्रवास यावरील वक्तव्याचा आलेख विद्यार्थी दशा व जग यातील फरक खूप साधेपणाने सांगून सर्व विद्यार्थ्यासह शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तर पंकज महाराज गावडे यांनी स्वतःच्या स्फूर्तीपर व बोधपर वक्तव्यांचा विद्यार्थ्यांस भावी पिढी घडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. कितीही मोठे झालात तरी शाळेला व शिक्षकांना कधीही विसरू नका असा गुरुमंत्र यांनी सर्वांना दिला. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीलिमा व्यवहारे, सौ निर्मल पंडीत, रुचीरा खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन शाखेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अभिजित टकले, पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर, शिल्पा क्षीरसागर, शुभा कुलकर्णी, पूनम पांढरे, सना इनामदार व पल्लवी नारखेडे या सर्वांच्या सहयोगाने करण्यात आले होते.
Share