
महावार्ता न्यूज: मुळशीतील औघोगिक नगरी पिरंगुट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल दामोदर पवळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
सौ. सारिका केदारी यांनी राजीनामा दिल्याने पिरंगुट ग्रामपंचायत उपसरपंचची निवडणुक घेण्यात आली. ग्रामविकास अधिकारी रायकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी विद्यमान सरपंच चांगदेव पवळे, ग्रामविकास अधिकारी भोजणे, माजी सरपंच बाळासाहेब गोळे, पोलिस पाटील प्रकाश पवळे, आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार व महावार्ताचे संपादक संजय दुधाणे, माजी उपसरपंच रामभाऊ पवळे, प्रविण कुंभार , ज्ञानेश्वर पवळे, विकास पवळे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच राहुल पवळे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पिरंगुट नगरीच्या विकासाचे शिल्पकार व पिरंगुट व्यापारी महासंघाचे कार्यक्षम अध्यक्ष राहुल पवळे यांच्या मातोश्री ललिता दामोदर पवळे यांनी सरपंच पद भूषवले होते.
पिरंगुटचा आधुनिक, आरोग्यदायी विकास करणार : राहुल पवळे
विद्यमान सदस्यांनी पिरंगुटला आदर्श ग्रामपंचायतीचा पुरस्कार प्राप्त करून दिला आहे, आता स्मार्ट, आधुनिक आणि आरोग्य दायी ग्रामपंचायतीसाठी आम्ही प्रयास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच राहुल पवळे यांना महावार्ताला सांगितले.
Share