महाराष्ट्र
Trending
मुळशीत उरावडे, वाळेण दुर्घटना, राष्ट्रीय कुटुंब योजनेसह 89 लाख 65 हजारांचे आज होणार वाटप

महावार्ता न्यूज ः मुळशीतील उरावडे येथील अग्नी दुर्घटनेतील 17 कामगारांना प्रत्येकी 5 लाख, वाळेण ओढ्यात बुडलेल्या मृत वारसदार व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना असे एकूण 89 लाख 65 हजार 400 रूपयांचे पौड येथे करण्यात येणार आहे.
पौड येथील पंचायत समितीच्या सेपापती बापट सभागृहात शनिवारी 10 जुलैला 11 वाजता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे, आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते वारसांना मदतनिधीचे वाटप केलेे जाणार आहे. यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदिप जठार, पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ उपस्थित रहाणार आहे.
एस व्ही एस कंपनी आग दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखप्रमाणे 17 कुटुंबियांना 85 लाख, आग दुर्घटनेतील गंभिर 2 जखमींना प्रत्येकी 12700, वाळेण दुर्घटनेतील 4 वारसांना प्रत्येकी 1 लाख, आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील दोघांना प्रत्येकी 20 हजार असे एकूण ण 89 लाख 65 हजार 400 रूपयांचा मदतनिधींचे संयुक्त वाटप शनिवारी करण्यात येणार आहे.
भयाण वास्तव – मुळशी अग्नी दुर्घटना
आई मला खेळण्यासाठी कॅरम आणणार होती….. पण ती आलीच नाही…
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या शब्दांनी एका क्षणार्धात संपूर्ण वातावरण सुन्न केले.
उरवडे येथील अग्नितांडवाध्ये मृत्यू पावलेल्या कै मंगल बबन मरगळे यांच्या तेजस आणि दर्शन मरगळे या दोन्ही मुले सहा दिवसांनंतरही आईची वाट पहात आहे. मुळशीतील खारावडे येथील धनगर वाड्यातील संजय दुधाणे यांचा हा रिपोर्ट
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
Share