खेळ खेळाडू
Trending

ऑलिम्पिकसाठी जाणार्‍या संजय दुधाणे यांचा आमदार थोपटेंच्या हस्ते सन्मान, राजेंद बांदल, गंगाराम मातेरे, सुहास भोतेंनेही दिल्या शुभेच्छा

ऑलिम्पिक हॅटट्रिक करणार्‍या मुळशी रत्न दुधाणे यांनी आपल्या तीन्ही ऑलिम्पिक अनुभवावर पुस्तक लेखन करावे - आमदार संग्राम थोपटे


महावार्ता न्यूज ः टोकिओ ऑलिम्पिक वृत्तांकनासाठी निवड झालेल्या प्रा. संजय दुधाणे यांचा मुळशीकरांच्या वतीने आज आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुळशी तालुका, पेरिविंकल शाळा व मुळशी काँग्रेसच्या वतीनेही दुधाणे यांना राजेंद्र बांदल, गंगाराम मोतेरे, सुहास भोते यांना शुभेच्छा दिल्या.
पेरिविंकल शाळेच्या सभागृहात झालेल्या नागरी सत्कारात संजय दुधाणे यांना शाल, श्रीफळ, सन्माननिन्ह, भक्ती-शक्ती शिल्प व धनादेश देऊन आमदार संग्राम थोपटे यांना गौरवित केले. यावेळी पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल, मुळशी काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, कॉग्रसचेे युवानेते मधुर दाभाडे, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सुहास भोते, पेरिविंकलच्या संचालिका रेखा बांदल, डॉ. अशोक कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नीलिमा व्यवहारे, सौ निर्मल पंडीत, रुचीरा खानविलकर, बावधनेचे माजी सरपंच विकास गुरव, काँग्रेसचे दत्ता जाधव, उमेश कांबळे, अमित बांदल आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नागरी सत्कार समारंभानिमित्त आमदार संग्राम थोपटे यांनी प्रथमच पेरिविंकल शाळेस भेट देऊन आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच राजेंद्र बांदल यांच्या कार्याचे कौतुक केले. संजय दुधाणे तिसर्‍यांदा ऑलिम्पिकला चालले असून मी देखिल तिसर्‍यांदा निवडून आलो आहे असू सांगून आमदार थोपटे पुढे म्हणाले की, ऑलिम्पिक हॅटट्रिक करणार्‍या मुळशी रत्न दुधाणे यांनी आपल्या तीन्ही ऑलिम्पिक अनुभवावर पुस्तक लेखन करावे त्याचा उपयोग महाराष्ट्रातील खेळाडूंना होईल. दुधाणे यांच्या कार्याला व त्याच्या टोकिओ प्रवासाला मी शुभेच्छा देत आहे.
पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांनी संग्राम थोपटे यांच्या कार्याचा गौरव करीत सांगितले की मुळशतील अग्नी दुर्घटना असो वा वाळेण दुर्घटना आमदार सदैव मुळशीकरांच्या मदतीला धावले आहेत. संजय दुधाणे यांच्या क्रीडा लेखन कार्याचा उल्लेख करून बांदल शेवटी म्हणाले की, दुधाणे हे मुळशीचे भूषण आहे. पत्राकरिता करता करता मुळशीतून खेळाडू घडविण्यासाठी त्याचे योगदान मोठे आहे.
कॉग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी संजय दुधाणे यांच्या ग्रामिण पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला. दुधाणेे यांच्या सोबत पुढील ऑलिम्पिकमध्ये मुळशीतील खेळाडूंची निवड व्हावी अशी आशा मातेरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आकाश जाधव यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे यांनी मानले.
कॉग्रेसच्या वतीनेही गौरवचिन्ह देऊन विशेष सत्कार
पेरिविंकल स्कूलच्या नागरी सत्कारात मुळशी तालुका कॉग्रेसच्या वतीने ऑलिम्पिक बोधनिन्ह असलेले विशेष सन्मानचिन्ह देऊन संजय दुधाणे यांचा आमदार संग्राम थोपटे, मुळशी काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, कॉग्रसचेे युवानेते मधुर दाभाडे, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सुहास भोते, सुरेश पारखी, कुमार शेडगे, समीर सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार संजय दुधाणे यांची टोकिओ ऑलिम्पिक वृत्ताकंनासाठी निवड

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून सलग तिसर्‍यांदा सन्मान

बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇 

पत्रकार संजय दुधाणे यांची टोकिओ ऑलिम्पिक वृत्ताकंनासाठी निवड, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून सलग तिसर्‍यांदा सन्मान

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close