खेळ खेळाडू
Trending

संजय दुधाणे ऑलिम्पिकसाठी आज होणार जपानला रवाना, भुकूम मठात विशेष सत्कार

महावार्ता न्यूज ः लंडन, रिओ ऑलिम्पिकनंतर जपान देशात होणार्‍या 32 व्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार, महावार्ताचे संपादक संजय दुधाणे यांनी तिसर्‍यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून निवड झाल्याने भुकूम येथील संत गणोरेबाबा यांच्या मठात विशेष सत्कार करण्यात आला. मंगळवारी ते जपानला रवाना होणार आहे.
भुकूममधील संत गणोरेबाबा व विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हरिराम मठाचे विश्वस्त एकनाथ हगवणे, सामाजिक कार्यकर्ते विजय माझिरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन संजय दुधाणे यांना टोकिओ ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मामासाहेब मोहोळ संस्थेचे सचिन पवळे, मुळशी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, राहुल इंगवले उपस्थित होते.
न्यूज 18 लोकमत चॅनेलसाठी ते थेट टोकिओतून वृत्तांकन करताना दिसणार आहेत. तसेच दै. पुढारी दुधाणेंचा क्रीडास्तंभ प्रकाशित होणार आहे.
टोकिओमध्ये 23 ते 8 ऑगस्ट दरम्यान जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक स्पर्धेचा कुंभमेळा रंगणार आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या ऑलिम्पिकसाठी भारतातील 60 पत्रकारांनाच ऑलिम्पिक वृत्तांकनाची संधी लाभली असून यामध्ये मुळशीरत्न संजय दुधाणे यांचा समावेश आहे. यापूर्वी इंग्लंड व ब्राझिल देशातील ऑलिम्पिक स्पर्धेचे त्यांनी थेट वृत्ताकंन केले होते. ऑलिम्पिकसाठी सलग तिसर्‍यांदा जाणारे दुधाणे एकमेव मुळशीकर आहेत. लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांचा षटकार अनुभवणारे ते एकमेव मराठी मराठी आहेत.

भारतीय ऑलिम्पिक समितीव्दारे ऑलिम्पिकला जाणार्‍या पत्रकारांची नावे निश्चित केली जातात. यामधून 800 पेक्षा अधिक अर्जातून 100 पत्रकारांची नावे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे पाठविली जातात. त्यानुसार आय ओ सी पत्रकारांची निवड करते. भारताकडून 60 ते 80 पत्रकारांची निवड होते. यामध्ये गेली तीन ऑलिम्पिक संजय दुधाणे यांची निवड होत आहे. ऑलिम्पिकच्या आधी दिड वर्ष ही प्रक्रिया सुरू असते.
संजय दुधाणे यांनी लंडन ऑलिम्पिक 2012, इन्चॉन आशियाई स्पर्धा 2014, रिओ ऑलिम्पिक 2016, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2010, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा 2011, विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा 2019, विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वृत्तांकन केले आहे.
ऑलिम्पिकवर संजय दुधाणे यांची चार पुस्तके प्रकाशित असून क्रीडा विषयावर त्यांची 18 पुस्तकांचे ते लेखक आहेत. दुधाणे यांच्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद या दोन्ही पुस्तके मराठीसह हिंदी व इंग्रजीतून केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केली आहेत. या दोन्ही पुस्तकांमधील काही भाग महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ठ करण्यात आला आहे.
संजय दुधाणे सध्या महावार्ता न्यूज पोर्टलचे संपादक असून ते अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सीएसआर माध्यमातून मदत करीत असतात. त्यांनी पुरस्कृत केलेला व त्यांनी पासपोर्टसाठी खर्च दिलेल्या प्रविण जाधवची टोकिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.

ऑलिम्पिकसाठी जाणार्‍या संजय दुधाणे यांचा आमदार थोपटेंच्या हस्ते सन्मान

पेरिविंकलचे संस्थापक राजेंद बांदल, काॅग्रेसचें गाराम मातेरे, सुहास भोतेंनेही दिल्या शुभेच्छा

बातमीसाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇

ऑलिम्पिकसाठी जाणार्‍या संजय दुधाणे यांचा आमदार थोपटेंच्या हस्ते सन्मान, राजेंद बांदल, गंगाराम मातेरे, सुहास भोतेंनेही दिल्या शुभेच्छा

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close