
संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त 20 07:21 मंगळवार रोजी छोटे वारकरी अगदी उत्साहात पालखीचे स्वागत ऑनलाइन पद्धतीने करताना दिसून आले .प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी देण्यात आल्या होत्या जसे चित्रकला, वारकरी पोशाख, तुळस सजावट, पालखी बनवणे, अभंग ,किर्तन स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहात या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला.

शाळेत मुले नसतानाही अजिबात असे वाटले नाही की मुले आपल्या समोर किंवा बरोबर नाहीत अगदी ऑफलाईन स्कूल असताना जसा आनंद पालखीला मुलांच्या व शिक्षकांच्या तोंडावर दिसायचा तसाच आनंद आज होता हे सर्व पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे असे म्हणाल्या की, “हेच तर संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची खासियत आहे ,अशक्य ते शक्य करून दाखवणे वाईट परिस्थितीत खचून न जाता त्याला सामोरे जाऊन यश मिळवणे .मला खरंच माझ्या सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षकांचा अभिमान आहे, की ज्यांच्या सहकार्यामुळे व खंबीर पाठिंब्यामुळेच आपण मुलांना उत्कृष्ट शिक्षण देऊन चांगली पिढी घडवत आहोत . शाळेच्या अध्यक्ष शिवाजी साठे यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक स्नेहा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Share