पुणे
Trending
मुळशीत आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या वतीने शिलाई मशीन वाटप
बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम : शेळके

महावार्ता न्यूज : बचत गटाच्या माध्यमाने ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिक दृष्टीने सक्षम होत असून बचत गट महिलांच्या विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे मत उद्योजक माधवराव शेळके यांनी व्यक्त केले.
आंदगाव ता. मुळशी येथील श्री समर्थ महिला बचत गटाच्या वतीने आंदगाव परिसरातील महिलांकरिता बचत गट लाभांश वितरण तसेच आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या वतीने शिलाई मशीन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेळके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आबासाहेब शेळके मित्रमंडळ, श्री.समर्थ महिला बचत गट व राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आंदगाव परिसरातील महिलांकरिता- रोजगार मार्गदर्शन व लाभांश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास मारणे यांनी केले. तसेच बचत गटाच्या माध्यमाने व्यवसायाच्या संधी याबाबत दीपा कुलकर्णी व बांबू प्रक्रिया उद्योग याबाबत अशोक काळे यांनी मार्गदर्शन केले. कमल मारणे यांनी बचत गटाच्या कार्याचा आढावा घेतला तर कैलास मारणे, राजेश कुलकर्णी , यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी आंदगाव येथील एका गरजू भगिनीला शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
यावेळी दीपाताई कुलकर्णी,प्रमिला आदमाणे (ग्रामपंचायत सदस्य) ,मीना संजय मारणे (माजी सरपंच ) ,कमल दत्तात्रय मोहोळ, डॉ.राजेश कुलकर्णी,डॉ. अशोक काळे ,शाकिर शेख, सोमनाथ शिंदे ,दत्तात्रय मोहोळ, पत्रकार तेजस जोगावडे,दत्ताजी आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते. कृषी तज्ञ रमेश मोगल यांनी आभार मानले.
Share