पुणे
Trending
अंबडवेट शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी मिळाली वाचनाची भेट !
डोरबीट फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम ..
महावार्ता न्यूज : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अंबडवेट ( ता. मुळशी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डोरबीट फाऊंडेशन पुणे यांच्याकडून ग्रंथालय उभारणी करुन वाचनाची अनोखी भेट दिली आहे. ग्रंथालयाचे उदघाटन अंबडवेटच्या सरपंच रोहिणी शिंदे व डोरबीट फाऊंडेशनचे संचालक इंद्रजित रॉय , संस्थापक विपिन श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले.
डोरबीट फाऊंडेशन पुणे समाजातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. मोहोळनगर (अंबडवेट) शाळेमध्ये सर्व विदयार्थी हे कातकरी आदिवासी समाजाचे आहेत. प्रेरणादायी बोधकथा, महापुरुषांची चरित्रे, माहितीपर पुस्तके अशा दर्जेदार पुस्तकांनी युक्त ग्रंथालयची भेट डोरबीट फाऊंडेशननी दिली आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर झालेल्या छोटखानी समारंभामध्ये ग्रंथालय उदघाटन , विद्यार्थांना स्टेशनरी वाटप ,खाऊवाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे कौतुक व डोरबीट फाऊंडेशन च्या पुढिल कार्यास शुभेच्छा अंबडवेटच्या सरपंच रोहिणी शिंदे यांनी दिल्या.
” डोरबीट फाऊंडेशन समाजातील गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत राहणार आहे.. ग्रंथालय उभारणी हा त्यामधील एक भाग आहे , अजूनही शैक्षणिक उपक्रम विविध ठिकाणी फाऊंडेशन करणार आहे असे प्रतिपादन डोरबीट फाऊंडेशनच्या कोअर कमिटीचे मुख्य विपिन श्रीवास्तव यांनी केले आहे तसेच श्रीवास्तव यांनी या उपक्रमासाठी निधी देणाऱ्या दात्यांचे आभार व्यक्त केले व अजून नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची ग्वाही दिली. “
डोरबीट फाऊंडेशनचा ग्रंथालय उभारणी चा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद आहे , विद्यार्थीनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन या उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य करावे असे अंबडवेटचे उपसरपंच संतोष ओव्हाळ यांनी म्हटले आहे. या कार्यक्रम प्रसंगी अंबडवेटच्या सरपंच रोहिणी शिंदे, उपसरपंच संतोष ओव्हाळ, प्रितम ढमाले , अंकुश जाधव , प्रज्ञा जाधव , सरिता अमराळे आदी ग्रामपंचायत सदस्य , तंटामुक्त गावचे अध्यक्ष शैलेश पवार ,पोलीस पाटील अशोक नागरे, डोरबीट फाउंडेशनचे संचालक इंद्रजित रॉय, विपिन श्रीवास्तव , आशिष कुमार रॉय, सायमा, अभिषेकसिंग, अस्लम खान , अनंत , सौरभ कुंभार, सोनाली पारखी, दिक्षा बगाडे , ग्रामस्थ , पालक उपस्थित होते. संपूर्ण उपक्रमासाठी रोहित टिळक यांनी ऑनलाईन डिजाईन केले , या उपक्रमासाठी अभिलाष शास्त्री , भावना कंडपाल , अस्लम धनानी , समीहा खान , समीक अन्वर, अभिषेक सिंग , अनंत सिन्हा यांनी मेहनत घेतली , कार्यक्रमाचे संयोजन व संचालन मुख्याध्यापिका मंगल मारणे व सहशिक्षिका प्रिती टिळेकर यांनी केले. अशीष कुमार राय यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Share