पिरंगुटरत्न अमित गोळे यांचा पोलिसांकडून कोरोना योध्दा सन्मान
पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
पिरंगुट येथील प्रसिद्ध उद्योजक, विशेष कार्यकारी अधिकारी, मेडिकल आणि केमिस्ट क्षेत्रातील ॲड. अमित गोळे यांना पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्याकडून कोरोना संकट काळात कर्तव्यनिष्ठ राहून केलेल्या आदर्शवत आणि उल्लेखनीय कार्याबद्दल पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात अमित गोळे यांनी १०० गरजू कुटुंबाना संपूर्ण धान्य किट वाटप केले, पोलिसांना तसेच इतर नागरिकांना १००० मास्क व सँनिटायझरचे मोफत वाटप केले,१०० पेक्षा जास्त पाँझिटीव रूग्णांना हॉस्पिटल मध्ये जागा उपलब्ध करून दिली, ५० रूग्णांना रेमडेसिवर इंजेक्शन मूळ किंमतीत उपलब्ध करून दिले,गावात जंतूनाशक फवारणी केली,कोविड १९ बद्दल विषयी जण जागृती केली,लससाठी आरोग्य विभाग आणि सामान्य जनतेला मोलाचे सहकार्य केले आहे.अमित गोळे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पौड पोलिस स्टेशनच्या वतीने कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पवन चौधरी,पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड,संतोष भुमकर,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार,पोलिस हवालदार तुषार भोईटे, संजय सुपे, नितीन गार्डी उपस्थित होते.