महाराष्ट्र
Trending

नव्या झोनमुळे गोंधळलेली मुळशी, धास्तावलेले मुळशीकर

पीएमआरडी नवे झोन, नवा झोल - मुळशीकर सुपात, बिल्डर्स तूपात

महावार्ता न्यूज ः पीएमआरडीने मेट्रोसह नव्या मुळशीचे दिवास्वप्न रंगवत असताना केलेल्या झोन रचनेमुळे भूगावपासून ते मालेपर्यंतचे ग्रामस्थ गोंधळलेले आहेत. अनेक गावात पिढ्यांपिढ्या शेतीवर आरक्षण पडल्याने शेकडो मुळशीकर हवालदिल झाले आहेत.
नव्या झोनचा मुळशी तालुक्यात सर्वात मोठा फटका भुकूम ग्रामस्थांना बसण्याची शक्यता आहे. बिल्डर्स धार्जिन नवे रस्ते, बस डेपो, क्रीडांगण, रूग्णांलयाची सर्वाधिके आरक्षणे भुकूम गावात पडल्याने अनेक शेतकरी देशोधडीला जातील असे वातावरण तालुक्यात निर्माण झाले आहेत. लवळे व भुकूममध्ये 650 एकरची टाऊनशिपचा आराखडा मंजुर केला आहे. याचा फायदा शेतकर्‍यांचा आताच्या पिढीला होणार का, मूळात मुळशीत मंजुर झालेली म्हाळुंगे सिटी अजून पीएमआरडीने पूर्ण केली नाही. असेच भुकूमबाबत घडले तर शेतकर्‍यांनी किती वर्ष विकासाची वाट पहायची हा मोठा सवाल आहे.

पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण – पीएमआरडी जाहिर केलेल्या विकास आराखड्यामुळे मुळशीतील सर्वच गावांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकती पीएमआरडीच्या औध, आकुर्डी येथे नोंदविण्यास सुरूवात झाली आहे. पौड येथील तहसील कचेरीतही हरकती आणि सूचना नोंदविण्यात येणार आहेत.
नव्या प्रारूप आराखडयाचे नकाशा पीएमआरडीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केल्याने मुळशीत नव्या झोनबाबत गोंधळलेली स्थिती आहे. याबाबत भुकूूम येथे हरकतीबाबत शनिवार बैठकही घेण्यात आली. मंगळवारपर्यंत वकिलांच्या मार्फत हरकती, ग्रामपंचायतवतीने स्वतंत्र हरकती नोंदविण्याची प्रक्रिया होईल असे भुकूमचे उपसरपंच सचिन आंग्रे यांनी महावर्तााशी बोलताना सांगितले. विकासाचा आमचा विरोध नाही, आरक्षणे सर्व भागात सारखीच हवीत, बिल्डर्स धार्जिन आराखडा आम्हाला मंजुर नाही असेही आंग्रे यांनी सांगितले.
 
अन्यायकारक आराखडयाबाबत मुळशीकरांनी एकजूट व्हावे – सौ. निकिता सणस
पीएमआरडीच्या नव्या प्रारूप आराखड्यामुळे अनेक शेतकर्‍यांना अन्याय झाला आहे. मूळ सध्याचे रस्ते सोडून पीएमआरडीने नवे रस्ते मंजुर केले आहेत. यामुळे अनेकांची शेती धोक्यात येणार आहे. आहे तेच रस्ते मोठे करावेत, शेतकरी भूमीहीन होणार नाही याची खात्री करून रस्तेचे आराक्षण झाले पाहिजे. याबाबत मुळशीतील सर्व गावांनी एकजूट दाखवावी असे आवाहन भुगांवच्या सरपंच निकिता सणस यांनी केले आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close