राजकीय
Trending
आमदार थोपटेंच्या हस्ते 687 लाभार्थी कुटुंबियांना खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किटचे वाटप सुरू

महावार्ता न्यूज ः भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या पात्र १८५ लाभार्थी कुटुंबियांना खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य व किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात आले .मुळशीतील दौर्यात मुठा, पौड, माले आंबवणे येथील लाभार्थींला वाटप सुरू झाले आहे.
1)स्थळ:-विठ्ठल रुख्मिनी मंदिर,मुठा ता.मुळशी वेळ:- सकाळी10 वाजता पात्र लाभार्थी संख्या 192 कुटुंब
2)स्थळ:-पंचायत समिती सभागृह पौड ता.मुळशी वेळ:-सकाळी 11वा.30 मिनिटे पात्र लाभार्थी संख्या 185 कुटुंब
३)स्थळ:-पिंक गार्डन मंगल कार्यालय,माले ता.मुळशी वेळ :-दुपारी 1 वाजता पात्र लाभार्थी संख्या 220 कुटुंब
4)स्थळ:- जि. प.प्राथ. शाळा आंबवणे ता.मुळशी वेळ :- दुपारी 4 वाजता पात्र लाभार्थी संख्या 78
मुळशी तालुक्यातील पौड येथील पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी मुळशी काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, आदिवासी जमातीच्या संघटनेचे ता.अध्यक्ष शंकर बत्ताले, उज्वल ववले,गणेश कंधारे,गणेश पवळे, संजय जाधव,रवींद्र जाधव,विजय वाल्हेकर व पदाधिकारी, पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संजयभाऊ उभे, पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अँड शिवाजीतात्या जांभुळकर, मुळशी ता.बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, संदीप केदारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव, कुमार शेडगे, शिवाजी आप्पा तांगडे, मधुर दाभाडे, दौलतराव मारणे, कैलास आप्पा चौधे, प्रसाद खानेकर, गटविकास अधिकारी संदीप जठार,आदिवासी विकास विभागाचे अधिकारी गोगावले, कवटाळे, माने, बिराजदार यांचेसह मुठा गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामस्थ मुठा खोऱ्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते
Share