देशविदेश
Trending
पेरिविंकल शाळेच्या सीमेवरील जवानांपासून स्थानिक पोलिसांपर्यंतच्या रक्षाबंधनाचे देशात कौतुक
बांदल सर थँक्स हा नारा सीमेवर घुमला.

महावार्ता न्यूज ः पुणे जिल्ह्यातील आदर्श उपक्रमाची शाळा हा लौकिक कायम राखत मुळशीतील पेरिविंकल स्कूलने सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवून रक्षाबंधन सण देशभक्तीने साजरा केला तसेच स्थानिक पोलिस बंधूनाही राख्या बांधल्या. या उपक्रमाचे देशात कौतुक केले जात आहे.
पेरिविंकलच्या या रक्षबंधनाची दखल घेत बांदल सर थँक्स हा नाराही सैनिकांनी सीमेवर शिवछत्रपतीच्या पुतळ्याच्या साक्षीने घुमला.
चैतन्य विद्या प्रतिष्ठान, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन या शाळेत ‘रक्षाबंधन’ या सणाचे औचित्य साधून त्याचप्रमाणे या सणाचे महत्त्व पटावे म्हणून इ. ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी हाताने राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात केली.
या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या या पेरिविंकल स्कूलने जम्मू येथील सीमेवर असणाऱ्या जवानापर्यंत पोहचविल्या संरक्षण करतो देशाच्या सीमेचे,असे तो भरातभूचा नंदन,आम्ही साऱ्या भगिनी,
आदराने करतो तुज वंदन..अशा या पवित्र दिनी राख्या वेळेवर मिळाल्याने जवानांनी राख्या बांधून फोटो पाठवत आभारही मानले. खरं तर सलाम आमचा जवानांना , याचे सर्व नियोजन मार्गदर्शन शाळेचे संस्थापक माननीय श्री. राजेंद्र बांदलसर, संचालिका सौ. रेखा बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नीलिमा व्यवहारे, विभाग प्रमुख सौ. रुचिरा खानविलकर, सौ.निर्मल पंडित व शिक्षक वृंद यांनी केले.त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि त्यांच्या कामाला व शाळेला पोचपावतीही मिळाल्याने उत्साह व आनंद सर्वांकडून व्यक्त केला गेला.
पेरीविंकल शाळा बावधन शाखेतील विद्यार्थीनिनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोविड -19 च्या काळात देवदूताचे काम करणाऱ्या चेल्लाराम हॉस्पिटल, बावधन येथील डॉक्टरांना व रामनगर पोलीस चौकी येथील पोलीस बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
Share