पुणे
Trending

पीएमआरडीए झोनबाबत पौडमध्ये हरकती आजपासून स्वीकारणार

महावार्ता न्यूज: मुळशीतील पीएमआरडीए झोन व आराखडाबाबत 24 ऑगस्टपासून पौड येथे हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
PMRDA-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले असल्यामुळे, नागरिकांना त्यांचे आक्षेप/सूचना नोंदविण्यासाठी प्राधिकरण कार्यालयातील दोन क्षेत्रिय सहाय्यक/अभियंता ऋतुराज पाटील व अरुण आव्हाड यांची दिनांक 23 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे.
हे दोन्ही अधिकारी कार्यालयीन वेळेमध्ये मुळशी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये बसून, प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखडा- योजनेच्या आक्षेप आणि हरकती वरील कामकाज पाहणार आहेत.याची तालुक्यातील संबंधित शेतकरी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी असे मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले आहे.

आमदार संग्राम थोपटे यांचे आवाहन
भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील ज्या गावांचा PMRDA समावेश करण्यात आलेला आहे त्या गावातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, प्रारूप विकास योजनेसंबंधीत नागरीक आपल्या हरकती,सुचना अथवा टपालाद्वारे प्राधिकरणाच्या औंध येथील कार्यालयात जमा करण्यास लांब पडत असल्यामुळे नागरिकांना जवळ व सोईस्कर होण्यासाठी *PMRDA* चे आयुक्त यांचेकडे केलेल्या मागणीनुसार *दि.२३ आॅगस्ट २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१* दरम्यान *भोर तहसील कार्यालय, वेल्हा तहसील कार्यालय, मुळशी तहसील कार्यालय व नसरापूर क्षेत्रीय कार्यालय* या ठिकाणी सादर करु शकता.

तसेच प्रारूप विकास योजनेसंबंधीत *हरकती, सुचना घेणेकरिता भाग नकाशा, झोन दाखला यांची आवश्यकता नसून अर्जदार यांनी त्यांचे अर्जात संबधित गाव व गट नंबरचा उल्लेख करावा.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close