खेळ खेळाडू
Trending
संजय दुधाणेंचा मराठी क्रीडा पत्रकार संघाच्या वतीने आज मुंबईत सन्मान
ऑलिंपिक वारी करणाऱ्या तीन मराठी पत्रकारांची रंगणार आज गप्पांची मैफल

महावार्ता न्यूज : करोनाचे भीषण संकट असतानाही ऑलिम्पिक कव्हर करण्यासाठी टोकियो गाठणाऱ्या जिगरबाज संजय दुधाणे,संदीप चव्हाण, आणि जान्हवी मुळे यांच्या क्रीडा पत्रकारितेचा सन्मान मराठी क्रीडा पत्रकार संघ आणि ओढ हिरवळीची मीडिया हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी 25 ऑगस्टला केला जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी इतिहास घडला अन् हा इतिहास घडतानाचे साक्षीदार होते तीन मराठी क्रीडा पत्रकार. त्या तिघांनी केलेल्या भन्नाट वार्तांकनाचे कौतुक करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी मराठी क्रीडा पत्रकार संघाने ”इतिहास घडत असताना…” हा मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि निवेदक अश्विन बापट हा ऑलिंपिक वारी करणाऱ्या तिघा पत्रकारांशी मनमुराद गप्पा मारणार आहे. दरम्यान या तिघांचा सन्मान ऑलिंपियन नेमबाज दीपाली देशपांडे आणि भारत श्री तसेच राष्ट्रीय कबड्डीपटू विजू पेणकर त्यांच्या हस्ते केला जाईल. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रंगणाऱ्या सन्मान सोहळ्यासाठी क्रीडाविश्वातील अनेक मान्यवर मंडळीही उपस्थित राहणार आहेत.
Share