खेळ खेळाडू
Trending
कायदेपंडितांकडून ऑलिम्पिक पत्रकारांचा गौरव, अॅड.रविंद्र शिंदेंकडून संजय दुधाणे यांना शाबासकीची शाल

महावार्ता न्यूज ः टोकियो ऑलिम्पिकचे थेट वृत्तांकन करणारे प्रा. संजय दुधाणे यांचा कायदेपंडित अॅड. रविंद्र शिंदेें यांनी विशेष सत्कार करण्यात आला आहे.
म्हाळुंगे क्रीडनगरी जवळील कार्यालयात अभ्यासू कायदेपंडित रविंद्र शिंदें यांनी शाल, पुष्पगुच्छ देत संजय दुधाणे यांचा ऑलिम्पिक वारीनिमित्त सन्मान केला. याप्रसंगी पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, अॅड. पंकज महाजन उपस्थित होते.
अॅड. रविंद्र शिंदें यांनी संजय दुधाणे यांचा कार्याचा गौरव करीत सांगितले की, आपल्यामुळे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला ऑलिम्पिकचा थरार अनुभवता येत होतो. आपल्या थेट वृत्तांकनामुळे ऑलिम्पिकची परिपूर्ण वृत्तांकन पहाण्यास व ऐकण्यास लाभले.पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनीही भारताच्या सात ऑलिम्पिक पदकाचा साक्षीदार असलेले दुधाणे यांचे अभिनंदन करून ऑलिम्पिक विषयी माहिती जाणून घेतली. बांदल म्हणाले की, मुळशीची शान असलेले दुधाणे हे ग्रामिण पत्रकारिता आणि थेट आंतरराष्ट्रीय वृत्तांकन करणारे देशातील एकमेव पत्रकार आहेत. आम्हाच्या परिवाराचे ते सदस्य असल्याने आम्हाला त्यांचा साथ अभिमान आहे.
औपचारिक सत्कारनंतर अॅड. रविंद्र शिंदें, राजेंद्र बांदल, पंकज महाजन व संजय दुधाणे यांची देश-विदेश आणि ऑलिम्पिकमधील भारत या विषयावर गप्पांची मैफिल रंगली.औपचारिक कार्यक्रमात शेवटी दुधाणे यांनी सर्वांची आभार मानले. मूळचे परभणी असलेले रविंद्र शिंदे हे पुण्यातील एक अभ्यासू कायदेपंडित असल्याचा उल्लेख करीत दुधाणे म्हणाले की, आजही परभणीतून पुण्यात येणार्या तरूणांना शिंदे यांची सर्वोतोपरी मदत असते. सामाजिक भान असणार्या अभ्यासू वकिलांकडून झालेला या गौरव माझ्या लेखणीना, कार्याला बळ देणारा आहे.
Share