पुणे
Trending
आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने तालुका स्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन
तपपूर्ती वर्षा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

महावार्ता न्यूज ः आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने तपपूर्ती वर्षा निमित्त तालुका स्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुळशी तालुक्यात गेली अकरा वर्षांपासून मुळशी तहसील कार्यालय व पौड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने तालुका स्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करत आहे.
स्पर्धेचे हे बारावे वर्ष असून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने ऑनलाईन गणेश मंडळ स्पर्धा व शालेय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. तपपूर्ती वर्षाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने, गरजूंना मदत, शिक्षक गुणगौरव , मेहंदी स्पर्धा , रोजगार मेळावे यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
गणेश मंडळ स्पर्धेत व निबंध स्पर्धेत पात्र होणाऱ्या मंडळांना रोख पारितोषीक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धेत सहभागी मंडळाच्या उत्सव परिसराचे मोफत निर्जंतुकीरण करून देण्यात येणार आहे.शिवाय मंडळाच्या वतीने कोरोना जागृती करण्यासाठी व मंडळ कार्याची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता डिजिटल रथ जाणार आहे. याकरिता तसेच तालुका स्तरीय गणेश मंडळ स्पर्धा व निबंध स्पर्धेत सहभागी होऊन सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
Share