
महावार्ता न्यूज ः ब्रिटन्स कारपेट्स एशिया लिमीटेड या कंपनीतील 452 कामगारांचे लसीकरण करण्यात आले. कंपनी व सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने दुसरे लसीकरण पार पडले.
मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत या कंपनीने कामगारांचे हित जपत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना कवच सारखी विमा पॉलिसी, कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना 15 दिवसाची पगारी सुट्टी आणि अंतर्गत स्वच्छतेच्या मूलभूत गोष्टींची तरतूद केली त्याचाच एक भाग म्हणून 452 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस चे लसीकरण करण्यात आले. अशा पद्धतीने कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोसचे लसीकरण यशस्वीरित्या पार पाडले.
कंपनीने आत्तापर्यंत CSR फंडातून मुळशी तालुक्यात 6 शाळा,4 अंगणवाड्या, शाळेच्या छतावर पर्मनंट शेड, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह 50 हून अधिक E-learning kits इत्यादी मदत केली. कंपनीने संस्कार प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेसाठी प्रत्येक मुलाच्या जेवणाची व्यवस्था केली आहे व यापुढेही करत राहिल.
CSR फंडातून कंपनीने Education, Women Empowerment, Health and Environment यासाठी देखील कंपनी नेहमीच कार्य करते असे कंपनीचे एच्. आर. प्रमुख सतीश करंजकर यांनी सांगितले.
लसीकरणा च्या वेळी कंपनीचे एच्.आर. प्रमुख सतीश करंजकर प्रॉडक्शन मॅनेजर समीर कोलते, निखिल माळवदे, योगेश शिंदे व युनियन अध्यक्ष मनोहर तापकीर उपस्थित होते
Share