
पौड पोलिसांनी केलेले आवाहन
पौड पोलीस स्टेशन हददीतील सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना कळविण्यात येते की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या असून मिरवणुकीस बंदी घातलेली आहे. तसेच विसर्जन घाटावर एकत्र गर्दी न करता एक एकाने जाऊन विसर्जन साध्या पद्धतीने करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आज 5 वे दिवशी गौरी गणपती विसर्जन, 6 वे दिवशीचे विसर्जन, 7 वे दिवशीचे विसर्जन आणि अनंत चतुर्थी दिवशीचे विसर्जन यादिवशी कोणत्याही प्रकारे विसर्जन मिरवणूका काढू नयेत. जे कोणी नियमांचे उल्लंघन करतील त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी शासनाच्या नियमानुसार मिरवणूक विरहित बाप्पांचे विसर्जन करावे ही विनंती आहे. असे पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी कळवले आहे.
Share