पुणे
Trending

आबासाहेब शेळके मित्रमंडळाकडून शिलाई मशीन भेट

पौड येथील धानके कुटुंबियांना मिळणार हक्काचा रोजगार

महावार्ता न्यूज: मूळ पौडचे पण कामाच्या निमित्ताने पुणे शहरात वास्तव्यास गेलेल्या धानके कुटुंब कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रभावित झाले. हातचे काम गेले, नौकरी नाही, उदरनिर्वाहासाठी धानके कुटुंब आपल्या मूळ गावी पौडला परतले. सुरुवातीच्या काळात पौड ग्रामस्थांनी मदत केली. घरात आजार पण असल्याने नौकरी करणे कठीण,त्यामुळे उदरनिर्वाहासाठी काहितरी करणे गरजेचे. त्याकरिता भांडवल नाही. ही अडचण आखिल बाजारपेठ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आबासाहेब शेळके मित्रमंडळाचे संस्थापक माधवराव शेळके यांना कळविली. रेखा धानके शिलाईचे काम येत असल्याने त्यांना घरातल्या घरात रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता आबासाहेब शेळके यांनी आपल्या मंडळाच्या माध्यमाने शिलाई मशीन तात्काळ उपलब्ध करून दिली.
गणपती विसर्जन प्रसंगी रेखा शेखर धानके यांना ही शिलाई मशीन भेट देण्यात आली.यावेळी पौडगावचे सरपंच जगदीश लांडगे,उपसरपंच रसिकाताई जोशी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांच्या हस्ते शिलाई मशीन धानके कुटुंबीयांकडे हस्तांतरित करण्यात आली.
यावेळी आबासाहेब शेळके मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष शाकिर शेख, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास धुमाळ तसेच आखील बाजारपेठ तरुण मंडळाचे अध्यक्ष आशिष जोशी, तंटामुक्ति अध्यक्ष शामराव वाचकवडे,बाळासाहेब रायरीकर, उदयशेठ दोशी, बापूकाका जोशी, राजूकाका जोशी, राजूशेठ चंद्रकांत शेलार, सलील छत्रे, विशाल राऊत, मंदार दोशी, धनंजय जोशी, अभिषेक वाचकवडे, शान आतार, सुहास जोशी,मयूरशेठ मखी, विनोद कुबडे, दत्तात्रय कुबडे, आखिल बाजारपेठ तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ :- आखील बाजार पेठ गणपती मंडळ पौड येथे रेखा शेखर धानके यांना ही शिलाई मशीन भेट देताना आबासाहेब शेळके मित्रमंडळाचे कार्यकर्ते व मान्यवर

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close