खेळ खेळाडू
Trending
शासकीय नोकरी लाटणार्या तोतया खेळाडूला अटक
अनेक बोगस खेळाडू पोलिसांच्या गळाला लागणार?

महावार्ता न्यूज : बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून शासकीय नोकर्या लाटण्याचे प्रकार उघड होण्याचे प्रमाण हनुमानाच्या शेवटीप्रमाणे वाढतच चालले आहे. नाशिक, संभाजीनगर आणि नगर जिल्ह्यांतील कारवाईनंतर आता पुण्यातील हिंजवडी स्थानकातील पोलिसांनी प्रभाकर गाडेकर या शासकीय नोकरी लाटणाNया बोगस खेळाडूला अटक केली आहे. या प्रकरणात अनेक तोतया खेळाडू पोलिसांच्या गळाला लागणार आहेत.
प्रभाकर धोंडिबा गाडेकर असे बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून राज्य शासनाच्या पाच टक्के कोट्यातून शासकीय नोकरी लाटणार्या तोतया खेळाडूचे नाव आहे. सेपाक टकरॉव या खेळातील नाशिक जिल्हा संघातील बोगस प्रमाणपत्राच्या आधारे प्रभाकर गाडेकर याने नगर येथील शासकीय कोषागार कार्यालयात २०१९मध्ये लिपिकाची नोकरी मिळविली होती. हा तोतया खेळाडू जालना जिल्ह्यातील आहे. नाशिकमधील अन्याय झालेल्या खेळाडूंनी गतवर्षी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. बकोरिया यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातल्याने अखेर या तक्रारीची दखल हिंजवडी पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल केला होता. िंहजवडी पोलिसांनी तपास करत असताना ४ पेâब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य सेपाक टकरॉव संघटनेचे पदाधिकारी कृणाल आहिरे यांना अटक केली होती. त्यानंतर पुढील तपासात आता शासकीय नोकरी लाटणाNया प्रभाकर गाडेकर या तोतया खेळाडूला अटक झाली आहे. या खेळाडूची चार दिवसांची पोलीस कोठडी उद्या शुक्रवारी संपणार आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या या गोरखधंद्यात अनेक मोठी नावेही पुढे येण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इतर बोगस खेळाडू व काही पदाधिकाNयांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत हिंजवडी पोलिसांनी दिले आहेत.
‘सेपाक टकरॉव या खेळात आम्ही नाशिकचे पाच खेळाडू मागील काही वर्षांपासून राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहोत. मात्र, इतर अनेकांना संघटनेच्या पदाधिकाNयांनी पैसे घेऊन बोगस प्रमाणपत्रे दिली आहेत. या बोगस खेळाडूंमुळे आमच्यासारख्या प्रामाणिक खेळाडूंना पाच टक्के आरक्षणातील शासकीय नोकर्या मिळत नाहीत. एका बोगस खेळाडूला अटक झाल्याने उशिरा का होईना पण सत्याचा विजय झाला आहे. मात्र, बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची खोलवर चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी.’
– योगेश चव्हाण (खेळाडू, सेपाक टकरॉव)
‘आमच्याकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार तपास करताना बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळविणाNया प्रभाकर गाडेकरला आम्ही अटक केली आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. सबळ पुरावा मिळाल्यास इतर बोगस खेळाडू आणि त्यांना प्रमाणपत्रे विकणारे पदाधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.’
– उद्धव खाडे, सहायक पोलीस निरीक्षक
Share