राजकीय
Trending
मुळशीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा, खासदार सुळे करणार मार्गदर्शन

महावार्ता न्यूज ः मुळशीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वाटचाल सुरू केली असून मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भूगांव येथील राजलक्ष्मी लॉन्समध्ये मंगळवा 28 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची ताकद मुळशीत असून त्याचे शक्ती प्रदर्शनही या मेळाव्यात होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकारी संस्थेच्या निवडणुकीबाबत खासदार सुप्रिया सुळे या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार असून मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष महादेव कोंढरेसह पक्षातील सर्व अध्यक्षांनी मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे.
Share