
महावार्ता न्यूज ः भालगुडी येथे शेतात डुक्कराची शिकार करण्यासाठी करंट लावून बांधलेल्या लोखंडी तारेला चिकटून वृध्दाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.यामध्ये विठोबा पांडुरंग साठे ( वय ६१) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी चार जणांविरोधात पौड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार ( दि.२६) रोजी विठोबा साठे हे भालगुडी येथील कळमवाडी येथे शेतात राञी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. माञ भात शेतात डुक्कराची शिकार करण्यासाठी लोखंडी तारेला करंट लावून बांधलेली तार त्यांना न दिसल्याने त्या तारेला चिकटून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. सकाळी विठोबा साठे हे घरी आले नाही म्हणून घरातल्यांनी शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह शेतात पडलेला मिळून आला. याप्रकरणी भालगुडी येथीलच सदाशिव साठे, राम साठे, संतोष भिकूजी साठे, लक्ष्मण दत्तू साठे यांच्यावर पौड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी त्यांचा मुलगा नवनाथ विठोबा साठे ( वय.४०) याने पौड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
Share