
महावार्ता न्यूज : मुळशीत रविवार ०३ सप्टेंबर रोजी सांयकाळी संतोष विश्वनाथ माने वय ३८ यांच्या खूनाचा रात्रभरातच ओल्या अंडरवेअरवरून करून हिंजवडी पोलीसांची धडाकेबाज कामगिरी केली आहे. आरोपी कैलास अंकुश डोंगरे याला अटक करण्यात आली आहे.
संतोष विश्वनाथ माने, रा साखरेवस्ती हिंजवडी पुणे यांचा अज्ञात व्यक्तीने एका धारधार हत्याराचे वार करुन खुन करण्यात आलेला आहे. अशी महिला सरस्वती संतोष माने वय ३५ वर्ष रा. साखरेवस्ती हिंजवडी पुणे यांनी तक्रार दिल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं ७४६/२०२१ भादवि कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दाखल गुन्हयाच्या घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत यांनी वरिष्ठांचे आदेश व सुचना प्रमाणे दाखल गुन्हयांचा तपास करत असतांना सुरवातीला खुनाच्या बाबतीत कोणताही सुगावा उपलब्ध नव्हता आजुबाजुचे रहीवाशांकडे चौकशी करता या ठिकाणी बाहेरुन नवीन कोणी आले नव्हते म्हणुन हा खुन कोणी व कशासाठी केला हा प्रश्न पोलीसांसमोर उभा राहीला होता व सुरुवातीला पोलीसांची दिशाभुल करण्यात मयताचे शेजारी राहणारे लोकांना यश आले होते.
सहा पोलीस उपनिरीक्षक मारणे यांचे नजरेमध्ये शेजारच्या मुलाची आंघोळ केलेली ओली अंडवेअर दिसली सहा पोलीस
उपनिरीक्षक मारणे यांचे मनात प्रश्न उपस्थित झाला की, घरातील सर्व कपडे सुकलेले आहेत पंरतु एक अंडवेअर फक्त ओली का? एवढया रात्री मुलाने आंघोळ का केली ? त्या अनुषंगाने शेजारच्या नागरीकांना वेगवेगळया पध्दतीने कसुन विचारपुस केली व शेवटी आरोपी नामे कैलास अंकुश डोंगरे वय २३ वर्ष रा. तुषार सुदाम साखरे यांची रूम साखरेवस्ती हिंजवडी पुणे याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन मयत व त्याची पत्नी यांचे आरोपी यांचे आई वडील यांचसोबत होणाऱ्या सततच्या भाडणामुळे खुन केल्याचे कबुल केले आहे.
आरोपी याचेकडे सविस्तर चौकशी चालु आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खडके हे करत आहेत.
सदरची कारवाई मा.कृष्णप्रकाश सो,पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.डॉ. संजय शिंदे सो, अप्पर
पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.आनंद भोईटे पोलीस उपआयुक्त सो, परि-२ पिंपरी चिंचवड, मा.श्रीकांत डिसले, सहा.पोलीस आयुक्त , वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत, पोलीस निरीक्षक सो,(गुन्हे, अजय जोगदंड, सुनिल दहिफळे सो, तपास पथकाचे प्रमुख सपोनि,सागर काटे, सपोनि उध्दव खाडे, पोलीस उप-निरीक्षक,समाधान कदम, गाढवे,
खडके सहा.पो.उप-निरिक्षक बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कल्पेश बाबर, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडु, सुभाष गुरव, भिमा गायकवाड, आण्णराव राठोड, नुतन कोंडे, यांनी केली
आहे.
Share