
महावार्ता न्यूज: ओसंडून वाहणारा उत्साह… भिरभिरणारे डोळे… आणि मन मात्र कधी शाळेत पोहचणार या विचारात दंग… कुठे रांगोळी तर कुठे फुलांनी केलेले स्वागत.. हे चित्र होते पुणे जिल्ह्यातील आदर्श पेरिविंकल स्कूलमधील.
आज तब्बल पावणे दोन वर्षांनी पेरिविंकलच्या बावधन, पिरंगुट, सूस, पौड येथील शाळा व महाविद्यालयाची घंटा वाजली. परस्पर भेटीचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
शाळेत आज वेगळीच लगबग सुरू होती. प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. शाळेची घंटा फुलांनी सजविली होती. प्रवेशद्वारावर विद्यार्थींचे अनोख्या पध्दतीने स्वागत होत होते. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय विद्यार्थ्यांनी स्विकारला. ऑनलाइन शाळेमुळे दुरावलेल्या मित्रांच्या भेटीचा आनंदही विद्यार्थ्यांना होता.
संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या कार्यकुशलतेमुळे मुळशीत ऑनलाईननंतर ऑफलाइन शाळा पेरिविंकल अव्वल असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले.
शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येईल याबाबत काहींना आनंद होता, तर काहींनी वह्यापुस्तकांचा सहवास मिळेल, धम्माल करता येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल च्या बावधन , सूस, पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये आज दि. 4 ऑक्टोबर रोजी इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची शाळा ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष रित्या सुरू करण्यात आली. शासनाने दिलेल्या मंजुरीचे व सूचनांचे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने शाळा सुरू करण्यात आली.
सुमारे दीड वर्ष घरूनच ऑनलाईन शिकणार्या विद्यार्थ्यांचे आज शाळेत अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना वेलकम बॅक टू स्कूल चे भेटकार्ड देऊन पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले .सोबत सॅनेटायझर चे सॅचेट सर्व विद्यार्थ्यांस देवून वर्गात जाताना सर्व विद्यार्थ्यांवर पुष्यवर्षाव करून खूप उत्साहात सर्व विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे एक आनंदाचा आगळा वेगळा शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला.
सर्व विद्यार्थी देखील प्रथम दिवशी खूपच उत्साहात दिसत होते. पहिला दिवस म्हणुन आज शिक्षकांनी मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. चरखा बनवणे व ईतर काही उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीत राबविण्यात आले.अशा प्रकारे सर्व नियमांचे पालन करत इ. 5 वी ते 10 वी ची शाळा अत्यंत उत्साहात यशस्वीरित्या सुरू करण्यात आली.
सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा यशस्वीरित्या सुरू करण्याचे नियोजन हे शाळेचे संस्थापक- अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, सूस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित, पिरंगुट शाखेचे अभिजित टकले व कॉलेजच्या रुचीरा खानविलकर यांच्या नियोजनाखाली पर्यवेक्षक रश्मी पाथरकर , सूस शाखेतील पर्यवेक्षीका शुभा कुलकर्णी, पिरंगुटच्या पूनम पांढरे, साना इनामदार, पल्लवी नारखेडे व जिनी नायर यांच्या सहकार्याने सर्व शिक्षकवृद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीपणे शाळेचा पहिला दिवस संपन्न झाला. उद्या पासून नियमित शाळेत येण्यासाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्याने उत्सुक भाव दिसून येत होते. अशा प्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने शिक्षणोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
Share