महाराष्ट्र
Trending
मुळशीत उद्या एकनाथ शिंदेंचा झंझवात, बावधनमध्ये रूग्णवाहिका लोकार्पणाची जय्यत तयारी
शिवसेनेचे युवानेते राहुल दुधाळे यांच्याकडून आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन

महावार्ता न्यूज: मुळशीत रविवारी भगवे वादळ घुमणार आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी 10 ऑक्टोबरला झंझावाती दौरा असणार आहे. बावधनमध्ये शिवसेनेचे युवानेते राहुल दुधाळे यांच्याकडून रूग्णवाहिका लोकार्पण आरोग्यदायी उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

बावधन बुद्रक येथील बापुजीबुवा मंदिर परिसरात रविवारी 12 वाजता रूग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रमाकडे सार्या तालुक्याचे लक्ष वेधले आहेत. नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रूग्णवाहिका सेवेस सुरूवात होईल. यासंगी पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर, शिवसेना समनव्यक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. बावधनचे माजी सरपंच शिवसेनेचे युवानेते राहुल दुधाळे यांनी या कार्यक्रमामुळे पुणे मनपाच्या आगामी निवडणुकीची समीकरणे बदलणार आहे.
वडिल स्व.गजानन नाना दुधाळे यांच्या स्मरणार्थ राहुल दुधाळे यांच्याकडून रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल बावधनसह पुणेकरांकडून दुधाळे यांचे कौतुक होत आहे.

मुळशीत आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना सरसावली आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुळशी दौरा आहे. दौर्याच्या सुरूवातीला सुचंद्रिका मंगल कार्यालयात 100 दिव्यांग व 100 कोरोना योद्धांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा नामदार एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब चांदेरे हे या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.
कार्यकर्ता मेळाव्यानंतर घोटवडेफाटा (ता. मुळशी) येथील कृपा हॉटेल शेजारी माधवराव उर्फ आबासाहेब शेळके यांच्या नवीन शिवसेना जनसंपर्क कार्यालाचे उदघाटन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल.

शिंदे यांच्या मुळशी दौर्याचा समारोप बावधन येथील शिवसेनेचे युवानेते राहुल दुधाळे यांच्या कार्यक्रमाने होईल. त्यानंतर बावधन येथून शिंदे हे हेलिकेप्टरने हडपसरलस रवाना होतील.
Share