पुणे
Trending
मुळशीतील प्रतिष्ठेचा तुळजाभवानी पुरस्कार कमल मोहोळांना घोषित
पांडूरंग दुधाणे यांच्या स्मरणार्थ सलग 9व्या वर्षी नारीशक्तीचा गौरव

महावार्ता न्यूज :- जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 9वा तुळजाभवानी पुरस्कार बचत गटातून महिलांना आत्मनिर्भर करणार्या सौ. कमल दत्तात्रय मोहोळ यांना घोषित झाला आहे.
महावार्ता वेब पोर्टलच्या परिवाराच्या वतीने होणार्या तुळजाभवानी व माय मुळशी पुरस्काराचे वितरण गुरूवारी 14 ऑक्टोंबर रोजी संध्या 5.30 वाजता पिरंगुटमधील घोटावडे फाट्याजवळील श्री क्षेत्र भवानीनगर येथील मंदिरात होईल. आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण होईल. मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थिती रहाणार आहेत.
मुळशी तालुक्यातील मुठा गावातून महिला बचत गटातील शेकडो महिलांना रोजगार निर्माण करणार्या कमल मोहोळ यांची 2022 च्या पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे. मायमुळशी पुरस्काराने भुगांवच्या आदर्श सरपंच निकिता सणस, पिरंगुटमधून सीए झालेली मनाली सणस, गणेशोत्सव मंडळातून लोकजागृत करणारे आबा शेळके, पत्रकारितेव्दारे सामाजिक प्रश्न मांडणार पत्रकार प्रविण सातव यांचा सन्मान केला जाणार असल्याचे संयोजक संजय दुधाणे यांनी सांगितले आहे.
मानपत्र, स्मृतिचिन्ह, श्रीफळ, आणि पुस्तके असे तुळजाभवानी पुरस्काराचे स्वरूप असून मुळशीत विशेष कार्य करणार्या महिलेस या पुरस्कार देण्यात येतो. स्वर्गीय वीजतंत्री पांडूरंग दुधाणे यांच्या परिवाराच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत मधुरा भेलके, श्रद्धा वाळिंंबे, मिनाक्षी कुमकर, तनुजा आल्हाट, पूनम मेहता, स्मिता घैसास कोमल गोळे व सविता भूमकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वर्गिय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, पत्रकार, लेखक संजय दुधाणे, जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रामदास पवळे यांनी पुरस्काराची घोषणा केली आहे.
Share