महाराष्ट्र

मुळशीत पीएमआरडीए जबरदस्ती करणार नाही, रिंग रोडही लोकांच्या अपेक्षानुसारच ः एकनाथ शिंदे

आबासाहेब शेळके यांची जबाबदारी वाढली असल्याची मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

महावार्ता न्यूज: मुळशीतील चार दिशांना एकत्र आणणार्‍या घोटावडे चौकात रविवारी भगवे वादळ पहाण्यास मिळाले, ते शिवसैनिक आबासाहेब शेळके यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनाच्या निमित्ताने. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आबासाहेब शेळके यांची जबाबदारी वाढली असल्याची ग्वाही आज मुळशीकरांना दिली.
घोटवडेफाटा (ता. मुळशी) येथील कृपा हॉटेल शेजारी माधवराव उर्फ आबासाहेब शेळके यांच्या नवीन शिवसेना जनसंपर्क कार्यालाचे उदघाटन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले..यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर, शिवसेना समनव्यक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर,शिवसेना नेते तथा उद्योजक आबासाहेब शेळके, महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटीका स्वाती ढमाले, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, शिवसेना उपजिल्हा संघटक सचिन दगडे,समन्वयक दिपक करंजावणे,माजी तालुका प्रमुख रविकांत धुमाळ, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नामदेव टेमघरे, वैभव पवळे,अमित कुडले, कैलास मारणे,अनिल आधवडे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आबासाहेब शेळके यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असे सांगून नामदार शिंदे म्हणाले की, हा मुख्य चौक आहे, सगळे रस्ते तुमच्या कार्यालयाजवळ येतात. आता तुमची जबाबदारी वाढली आहे. सगळयांना सोबत घेऊन चांगले काम करा. या भागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. संघटना मजबूत करायची आहेमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मुळशीतील प्रश्न, अपेक्षित काम करण्याची संधी आपल्याला आली आहे. या संधीचे सोने करा असे सांगत मंत्री शिंदे पुढे म्हणाले की, नगरविकासाकडे जे काही प्रश्न असतील ते हक्काने मला सांगा, पीएमआरडीए प्रश्नही आपल्याला सोडवायचे आहेत, रिंग रोेडही लोकांचा अपेक्षित असल्याप्रमाणेच होईल. जबरदस्तीने कोणतेही काम होणार नाही. एवढी खात्री आपण बाळगा.
आमदार सुनील अण्णा शेळके, पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरूण लाड यांनीही आबासाहेब शेळके यांच्या संपर्क कार्यालया भेट दिली. यावेळी सौ. निर्मला शेळके, ज्ञानेश्वर शेळकेसह आबांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   या कार्यक्रमाचे आयोजन शाकीर शेख, पोपट ववले, विनोद मारणे, सोमनाथ शिंदे, सौरभ सांळूके यांनी केले होते

मंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close