महाराष्ट्र
Trending

मुळशीत महाविद्यालयीन शिक्षणातही पेरिविंकल अग्रेसर, KG टू FYJC सायन्स, कॉमर्स, आर्टसचे फुलले वर्ग

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या P.EM.S जूनियर कॉलेजचा ओरियेंटेशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

महावार्ता न्यूज : शालेय शिक्षणापाठोपाठ आता चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल स्कूलने 11 वी, 12 वी कनिष्ठ महाविद्यालय सायन्स, कॉमर्स व आर्टसच्या विद्यार्थ्यानी फुलले आहे.

P.E.M.S.Junior कॉलेजच्या सूस व पिरंगुट शाखेत सायन्स, कॉमर्स व आर्टस या तिन्ही शाखा सुरू झाल्या. मंगळवारी 12 ऑक्टोबर 2021 रोजी सूस येथील शाखेत (अभिमुक्तता कार्यक्रम) ओरियेंटेशन प्रोग्राम चे औचित्य साधून FYJC म्हणजेच 11 वी च्या सायन्स, कॉमर्स व आर्टस या तिन्ही शाखेच्या पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा माहितीपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा विद्यार्थी व पालकांना कॉलेज त्याच्या शाखा विषयांची निवड याबद्दल माहिती देणे हा होता.
ओरियेंटेशन च्या या कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपरिक पद्धती प्रमाणे सरस्वती पूजन करून करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल , संचालिका सौ. रेखा बांदल व शाळेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या हस्ते पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी व सोनाली देऊसकर यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून ओरियेंटेशन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
सर्वांचे स्वागत करून प्रोजेक्टरच्या सहाय्याने चैतन्य विद्या प्रतिष्ठानचा KG to FYJC चा प्रवास तसेच चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटसची माहिती, जूनियर कॉलेज बद्दल माहिती, इ.11 वी ची मुल्यमापन पद्धती, परीक्षापद्धती, वार्षिक नियोजन व पुढील भविष्यासाठी च्या उपलब्ध संधी, विषय व विषय शिक्षकांची ओळख आदी सर्व माहिती PPT च्या सहाय्याने प्रोजेक्टर स्क्रीन द्वारे दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
सूस शाखेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना प्रथम मार्गदर्शन करून विद्यार्थीदशेतून युवावस्थेत पदार्पण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून सूस शाखेच्या स्थापनेपासून ते कॉलेज पर्यंत चा हा प्रवास कमी वेळात गाठला याबद्दल सर्वांचेच कौतुक केले. आज सूस व पिरंगुट शाखेत जूनियर कॉलेज ची सुरुवात हा खरच एक सुवर्णक्षण आहे व उपस्थित सर्वांचीच जबाबदारी वाढली असून सर्व जण ही जबाबदारी पेलण्यास समर्थ आहेत व अशीच उत्तरोत्तर प्रगती हेच ध्येय लक्षात ठेवून सर्व जण सज्ज होऊन प्रयत्न करतील व10 वी प्रमाणेच 12 वीतही 100% निकालाची परंपरा कायम ठेऊन उंच शिखर गाठतील अशी खात्री व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल , संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सूस शाखेच्या प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व नेत्रुत्त्वाखाली पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी, सोनाली देऊसकर कला शिक्षक सागर शिंदे सर यांच्या सहकार्याने पिरंगुट शाखेतील प्राचार्य अभिजित टकले, पर्यवेक्षिका पूनम पांढरे ,सना ईनामदार व सीमा , इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्दतीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी यांनी केले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close