पुणे
Trending
हिंजवडी आयटी नगरीतील तुळजाभवानी मंदिरात भविकांच्या तोरणाची रास
पांडुरंग वाघिरे यांनी स्वखर्चाने बांधले 20 वर्षांपूर्वी भावनी मातेचे भव्य मंदिर

महावार्ता न्यूज ः कोरोनाच्या पार्श्वभूमी मंदिर खुले झाल्याने हिंजवडीतील तुळजाभवानी मंदिरात साधेपणाने मात्र उत्साहात नवारात्र उत्सव साजरा होत आहे. 20 वर्षांपूर्वी शेतकरी कुटुंबातील पांडुरंग ज्ञानोबा वाघेरे यांनी भव्य मंदिर उभे केले आहे.
2002 पासून अनेक आय.टी. अभियंते मंदिरात नियमीत येत असून नवरात्रीच्या काळात संध्याकाळी या मंदिराच्या परिसरात भक्तीमय वातावरणाचा अनुभव येत आहे. अनेक संगणकतंज्ञ नाराळाचे तोरणेही अर्पण करतना दिसत असून आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिराची शोभाही लक्ष वेधून घेत आहे.
महाराष्ट्राचे नव्हे देशाचे भूषण असलेल्या हिंजवडीत म्हातोबा देवस्थान, शिवाजी चौकातील सुवर्ण गणेश मंदिर आणि तुळजाभवानीचे मंदिर ही आय.टीतील मंडळींची भक्तीतिर्थ बनली आहेत. हिंजवडी-वाकड मार्गावर आय.टी. पार्कच्या मुख्यरस्त्यावरच पांडुरंग ज्ञानोबा वाघेरे यांनी स्वखर्चाने 2002 मध्ये तुळजाभवानीचे प्रेरक मंदिर साकारले आहे. मंदिरात सुबक अशी मनमोहक तुळजाभवानीची मूर्ती असून देवीची साडीचोळीने पूजाअर्चा करण्यात येत आहे.
मंदिराचा परिसर चैतन्यदायी असून सारे वाघेरे कुटुंब देवीची मनोभावे सेवा करताना दिसत आहे. होमहवन, आरती, अन्नदान हे कार्यक्रमाहीनवरात्र उत्सवात सालाबादप्रमाणे करीत असल्याने वाघिरे परिवार पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
Share