पुणे
Trending
मुळशीच्या राजकारणाला नवी दिशा देणारा काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आज,
तालुक्याला राजकारणाला नवी दिशा देणारे मेळावा ठरेल - गंगाराम मातेरे

महावार्ता न्यूज: राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर काँग्रेसनेही निवडुणकी तसारीसाठी बिगुल वाजविला असून गुरूवारी 21 ऑक्टोंबरला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
घोटावडे येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात होणार्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार अशोक मोहोळ, विदुरा नवले हे प्रमुख उपस्थिती रहाणार असून कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्थांच्या निवडणुकीची तयारी व कृषि उत्पन्न बाजार समिती, शासकीय कमिटी वर निवड झालेल्या पदाधिकार्यांचा सत्कार समारंभ आयोजित केल्याची माहिती मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी सांगितले.
तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा हा मेळावा ठरेल असा विश्वास मोतेरे यांनी व्यक्त केला आहे.
Share