महाराष्ट्र
Trending
पिरंगुटमध्ये गुरूवारी आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे बक्षीस समारंभ
आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या कार्यकाळास दिग्गजांची उपस्थिती

महावार्ता न्यूज: आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी (ता. २८) होणार आहे.
आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाचे स्पर्धेचे १२ वे वर्ष होते. त्याच बरोबर यावर्षी महिलांसाठी मेहंदी स्पर्धेचे तर मुलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेचार वाजता या तीनही स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. शिवाव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके, दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती उद्योजक माधवराव उर्फ आबासाहेब शेळके यांनी दिली.
Share