पुणे
Trending
आबासाहेब शेळके मित्रमंडळाचा विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
पिरंगुटचे बालवीर युवक गणेश मंडळ तालुक्यात आदर्श गणपती मंडळ

महावार्ता न्यूज: आबासाहेब शेळके मित्रमंडळ आयोजित तालुकास्तरीय आदर्श गणेश मंडळ, मेहंदी व शालेय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पिरंगुट येथील पवळे पाटील प्लाझा या व्यापारी संकुलाच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व भेट वस्तू व स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर , तहसीलदार अभय चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पुणे जिल्हा युवा सेना समन्वयक अनिकेत घुले, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, महिला संघटक संगीता पवळे ,युवा सेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे, प्रकाश भेगडे,जि. प.सदस्य शंकर मांडेकर, पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच राहुल पवळे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,शांताराम इंगवले,बबनराव दगडे ,अक्षय शेळके,मंडळाचे अध्यक्ष पोपट ववले , शाकीर शेख,सोमनाथ शिंदे,कैलास बा.मारणे,सागर शिंदे, योगेश गोसावी, महेश मोहोल,समीर दुड़े,विनोद मारणे, अभिजीत भोसले,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव शेळके यांनी केले .आगामी काळात गणेश मंडळाच्या माध्यमाने तालुक्यातील तरुणांना सांस्कृतिक विषयाच्या आवडीबरोबरच व्यावसायिक दिशा देण्याचे काम आबासाहेब शेळके मित्रमंडळ प्रशासनाच्या सहकार्याने करेल असा संकल्प शेळके यांनी व्यक्त केला.
मंडळाने प्रशासनाच्या बरोबरीने गेल्या बारा वर्षांपासून बविलेले सामाजिक उपक्रम स्तुत्य असल्याचे मत तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यावेळी बोलताना म्हणाले की, आबासाहेव शेळके मित्र मंडळ तरुणांना योग्य दिशा देण्याचे काम करीत असून त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
तर मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, मुळशी व मावळ हे तालुके पुणे जिल्ह्यात सधन असलेले तालुके असून या दोन तालुक्याचे अतूट असे नाते आहे. आबासाहेब शेळके मित्र मंडळाने प्रशासन, पोलीस, सामाजिक संस्था व समाज यांना एकत्र घेऊन सुरू केलेला उपक्रम महाराष्ट्रातील आगळा वेगळा उपक्रम आहे.
कार्यक्रमाचे नियोजन योगेश गोसावी व त्यांच्या सहकार्यानी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार पवळे, गीतकार विनोद पाटणकर व गुणवंत शिक्षक राजेंद्र नाईकरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ पवळे, संतोष गावडे, ज्ञानेश्वर पवळे व ज्ञानेश्वर डफळ यांनी केले तर आभार शाकीर शेख यांनी मानले.
शालेय निबंध स्पर्धा ,मेहंदी स्पर्धा व गणेश मंडळ स्पर्धेतील विजेते स्पर्धक यांची अनुक्रमे नावे पुढीलप्रमाणे-
शालेय निबंध स्पर्धा विजेते यादी खालील प्रमाणे-
🔹 लहान गट( इ 5 वी ते 7 वी) मराठी माध्यम
प्रथम -स्वराज संतोष गावडे ,द्वितीय दिव्या मंगल पाटील
तृतीय सुहाना शाकीर शेख
लहान गट इंग्रजी माध्यम
प्रथम समर्थ संजय कोडग,द्वितीय मृण्मय संतोष पवारव
तृतीय सौम्या शिवकुमार नारायणपुरे
🔸 मोठा गट( इ 8वी ते 10वी) मराठी माध्यम
प्रथम आदिती नानासाहेब बोबडे,द्वितीय विराज संतोष गावडे,तृतीय पियुष शेखर ठोंबरे
मोठा गट इंग्रजी माध्यम-
प्रथम तराळ श्रावणी संग्राम,द्वितीय प्रतीक्षा ज्ञानदेव राऊत, तृतीय श्रेया संजय वराडे
*मेहंदी स्पर्धा विजेते नावे खालील प्रमाणे-
प्रथम – प्राजक्ता चंद्रकांत नांगरे द्वितीय -योगिता भाऊ मानकर ,तृतीय अंकिता हारपुडे
उत्तेजनार्थ
आरती साईनाथ मालपोटे, योगिता संजय पवार
आदर्श गणपती मंडळ विजेते नावे खालीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक बालवीर युवक मंडळ, पिरंगुट’ द्वितीय क्रमांक नवयुग तरुण मंडळ, शिंदेवाडी
तृतीय क्रमांक विभागून शिवराज कला क्रीडा मंडळ, कुळे व)धर्मवीर संभाजी मराठा मंडळ, रिहे
उत्तेजनार्थ-
हनुमान तरुण मंडळ, अंबडवेट,जाणता राजा मित्र मंडळ, भरे,प्रतापनगर मित्र मंडळ, लवळे, हुतात्मा नाग्या कातकरी गणेश मंडळ, पौडगाव
Share