जगाच्या पाठीवर
Trending

महावार्ता दिवाळी अंकाचे आज प्रकाशन, मुळशीतील लेखकांचा होणार सन्मान

महावार्ता न्यूज: मुळशीतील पहिले व सर्वाधिक वाचक असणार्‍या महावार्ता न्यूज पोर्टलच्या दिवाळी विशेषांकाचे शुक्रवारी 29 ऑक्टोंबर रोजी मुळशी-मावळचे प्रातांधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी मुळशीतील लेखक परशुराव वाघचौरे गुरूजी व उमेश वैद्य यांचा सन्मान केला जाणार आहे.

बावधन येथील पेरिविंकल स्कूलमध्ये महावार्ता दिवाळी अंकाचे मुळशी-मावळचे प्रातांधिकारी संदेश शिर्के व गटविकास अधिकारी संदिप जठार यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी पेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, पत्रकार रमेश ससार, विनोद माझिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. याप्रसंगी मुळशी सत्याग्रहावर लेखन करणो मुळशीतील लेखक परशुराव वाघचौरे गुरूजी व उमेश वैद्य यांचा सन्मान केला जाणार आहे.

महावार्ता दिवाळी अंकाचे हे 12 वे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात या विशेषांकाचे वाचक आहेत. महावार्ता न्यूज पोर्टलला मुळशी तालुक्यात सर्वाधिक वाचक असून यू टयूब चॅनेलला लाखापेक्षा अधिकांनी भेट दिली आहे.
महावार्ता दिवाळी अंकात संजय दुधाणे यांच्या टोकियो ऑलिम्पिकची वारीसह मुळशी सत्याग्रह, मुळशीतील समस्या यावर विशेष लेख आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close