जगाच्या पाठीवर
Trending

महावार्ता दिवाळी अंकाचे प्रातांधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते शानदार प्रकाशन

संपादक संजय दुधाणे यांच्या कार्याचे नंदूशेठ वाळंज, राजेंद्र बांदल, गंगाराम मातेरे यांनी केले कौतुक

महावार्ता न्यूज: मुळशीतील पहिले व सर्वाधिक वाचक असणार्‍या www.mahavarta.in महावार्ता न्यूज पोर्टलच्या दिवाळी विशेषांकाचे शानदार प्रकाशन शुक्रवारी मुळशी-मावळचे प्रातांधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुळशीतील लेखक परशुराम वाघचौरे गुरूजी यांचा सन्मान करण्यात आला.
 
बावधन येथील पेरिविंकल स्कूलमध्ये महावार्ता दिवाळी अंकाचे मुळशी-मावळचे प्रातांधिकारी संदेश शिर्के व पेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पेरिविंकल स्कूलचे संस्थापक राजेंद्र बांदल, सोनाई विद्यालयाचे संस्थापक नंदूशेठ वाळंज, मुळशी काॅग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवा नेते मधुर दाभाडे, महावार्ताचे संपादक संजय दुधाणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे उपस्थित होते.
प्रकाशन निमित्त मुळशी सत्याग्रहावर लेखन करणो मुळशीतील लेखक परशुराम वाघचौरे गुरूजी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन प्रातांधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमानंतर वाघचौरे यांनी सोशल मिडियावर व्यक्त केलेल्या भावना
मा.संजयजी दुधाने साहेब..
खूप खूप धन्यवाद !
आमच्यासारख्या तळागाळात काम करतांना हाल अपेष्टा सोसणाऱ्या शिक्षकांची उमेदीतही कुणी दखल घेतली नाही.पण मला माझ्या कामाची खरी पावती आज तुमच्या उदात्त विचारप्रवाहातून मिळाली.आणि सत्तरीतही अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली.पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद !
सदैव आपला ऋणी
श्री.परशुराम वाघचौरे गुरूजी, पौड
प्रकाशनानंतर राजेंद्र बांदल, नंदूशेठ वाळंज, गंगाराम मातेरे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. संपादक संजय दुधाणे यांचे क्रीडाक्षेत्रातील वृत्तांकन व मुळशीतील लेखन, संपादनाचे कार्याचे सर्वांनीच कौतुक केले. मुळशी तालुक्याचा झेंडा साता समुद्रापलीकडे पत्रकार संजय दुधाणे यांनी फडकविला असल्याचे सांगून वाळंज पुढे म्हणाले की, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडणारे व आंतरराष्ट्रीय स्तरावर थेट टिव्हीवर बातम्या देणारे दुधाणे हेच महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार आहेत.
प्रांताधिकारी शिर्के यांच्यामुळे सर्वसामान्यांचा न्याय मिळाला असल्याचे सांगून राजेंद्र बांदल यांनी सांगितले. मुळशीतील लेखकांचा विशेष गौरव समारंभ आयोजित करण्याचे आश्वासन यावेळी गंगाराम मातेरे यांनी दिले.

महावार्ता दिवाळी अंकाचे हे 12 वे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात या विशेषांकाचे वाचक आहेत. महावार्ता न्यूज पोर्टलला मुळशी तालुक्यात सर्वाधिक वाचक असून यू टयूब चॅनेलला लाखापेक्षा अधिकांनी भेट दिली आहे. महावार्ता दिवाळी अंकात संजय दुधाणे यांच्या टोकियो ऑलिम्पिकची वारीसह मुळशी सत्याग्रह, मुळशीतील समस्या यावर विशेष लेख आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close