पुणे
Trending
मुळशीत ड्रोनच्या सहाय्याने 103 गावांची होणार मोजणी
गावठाण भूमापन योजना अंतर्गत पौड येथून मोजणीस सुरूवात

महावार्ता न्यूज: मुळशी तालुक्यामध्ये ड्रोनच्या सहाय्याने एकशे तीन गावांची मोजणी होणार असल्याची माहिती मुळशीचे भुमिअभिलेख उपअधीक्षक प्रताप चौधरी यांनी दिली आहे.गावठाण भूमापन योजना अंतर्गत पौड येथून मोजणीस सुरूवात करण्यात आली आहे.
गावठाण भूमापन योजना ही अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयुक्त योजना असून ग्रामस्थांनी ग्रामसेवक व भूकरमापक यांचे मार्गदर्शन प्रमाणे आपल्या अगदी निश्चित करून घेण्याचे आवाहन केले आहे.
याची सुरुवात तालुक्याचे ठिकाण असलेले येथून सुरू झाली या मोजणीच्या वेळी ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना माहिती पुरवावी असे आवाहन चौधरी यांनी केले.
या उपक्रमामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावातील रस्ते घरे शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा नाले यांचे सीमा निश्चित होईल आणि मिळकतींचा नकाशा तयार होईल. कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल त्याच प्रमाणे ग्रामस्थांच्या नागरी आक्काच्या संवर्धन होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे या मोजणीची सर्व कार्यपद्धती अतिशय पारदर्शकपणे आणि सुलभपणे नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यामुळे प्रशासकीय नियोजनातील गावठाणाचे भूमापन नकाशे तयार होणार आहेत तसेच गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दी बाबत निर्माण होणारे वाद कमी होणार असून गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा यामध्ये उपयोग होणार आहे.यावेळी सरपंच जगदीश लांडगे ,ग्रामसेवक कदम ,भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ
पौड येथे गावठाण भूमापन योजनेची सुरुवात करताना भुमिअभिलेख उपाधीक्षक प्रताप चौधरी सरपंच जगदीश लांडगे आदी मान्यवर.
Share