पुणे
Trending

किरण दगडेंकडून सलग 6 व्या वर्षी 7000 कुटुंबाना दिवाळी सरंजाम भेट

नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी निवडणुकीवेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत : रावसाहेब दानवे पाटील

महावार्ता न्यूज: केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील हस्ते बावधन भुसारी कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यावतीने सलग 6 व्या वर्षी बावधन मधील  7000 कुटुंबाना दिवाळी सरंजाम भेट वाटप करण्यात आले.
लोक निवडणूकीत निवडून येण्यासाठी भरपुर आश्वासने देतात. मात्र ती पुर्ण करीत नाहीत. असा अनुभव मला अनेक वेळा आला. पण नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी निवडणुकीवेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. सातत्याने पाच वर्षे कार्यरत आहेत. याचा आनंद वाटतो. अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी
कौतुकाची थाप दिली.
नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने
आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी सरंजाम
वाटप दानवे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार
भीमराव तापकीर, नगरसेवक किरण दगडे पाटील,
नगरसेविका अल्पना वरपे, पियुषा किरण दगडे
पाटील, राजाभाऊ जोरी, बाळा टेमकर आदी
उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close