खेळ खेळाडू
मुळशीत महाराष्ट्र केसरीचा डंका, गादी विभागातून सौरभ शिंदे तर माती विभागातून मंदार ववले यांची निवड

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत गादी विभागातून नेरेच्या सौरभ शिंदे ने तर माती विभागातून भरे च्या मंदार ववले ने बाजी मारत महाराष्ट्र केसरीसाठी होणाऱ्या पुणे जिल्हा निवड चाचणीत आपले स्थान पक्के केले आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तयारीची तालुकास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा मारुंजी(ता. मुळशी) येथील पैलवान रुस्तम ए हिंद अमोल बुचडे अकादमीत संपन्न झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत याही वर्षीची निवड चाचणी स्पर्धा पार पडली.
विजेत्याना हिंजवडीतील दत्तामामा वाकळे व राम माझीरे यांच्यातर्फे सम्मानचिन्ह भेट देण्यात आले.पंच म्हणून रोहिदास आमले, चंद्रकांत मोहोळ, विठ्ठल मोहोळ ,निलेश मारणे ,विक्रम पवळे,सागर तांगडे, संजय दाभाडे, हनुमंत मनेरे, अमित खानेकर यांनी काम पाहिले.
मुळशी निवड चाचणीतील विजेते व उपविजेते मल्ल खालील प्रमाणे :-
गादी विभाग
गटनिहाय विजेते उपविजेते अनुक्रमे –
57. किलो – सार्थक सुतार( महाळुंगे )अजित तापकीर (मूलखेड)
61 किलो – विश्वजीत करंजावणे (भुकुम)यश झुंजूरके – (आंदगाव)
65 किलो- अजिंक्य ववले (भरे) नैनिश गोडांबे(घोटावडे)
70 किलो-ऋषिकेश सुतार(कासारआंबोली)औदुंबर शेळके
74 किलो- विराज कोळेकर( म्हाळुंगे)सुरज सावंत (हिंजवडी)
79 किलो- सुरज गुंड(उरवडे)प्रज्वल गोळे( पिरंगुट )
86 किलो-ऋषिकेश उणेचा (भुगाव) प्रेम दिसले(मारुंजी)
92 किलो-प्रज्वल सणस (भुगाव)निरंजन नाकते (दखणे)
97 किलो – सागर मोहोळ (मुठा) यशराज माथवड, (हिंजवडी)
माती विभाग विजेते उपविजेते अनुक्रमे –
57 किलो- ऋतिक पोळेकर (मारणेवाडी)अजित लिंबोरे (पिरंगुट)
61 किलो-कैलास इनामकर (म्हाळुंगे)राहुल देवकर (घोटावडे)
65 किलो-आकाश पाडाळे(म्हाळुंगे)अजय मापरे (बार्पे)
70 किलो- सनी भागवत(भुगाव)सौरभ उभे( कोळावडे)
74 किलो-चेतन मालपोटे(कातरखडक)पीयूष करपे (मुठा)
79 किलो-प्रज्वल गोळे (पिरंगुट)जय साखरे (हिंजवडी)
86 किलो-आदित्य सांगळे(भुगाव) विशाल रानवडे (नांदे)
92 किलो-युवराज मझिरे (भुकुम)रोहन मोरे( मुठा)
97 किलो-शंतनु बांदल(सुस) सुमित राऊत(लवळे)
महाराष्ट्र केसरी गट-
गादी विभाग
सौरभ शिंदे(नेरे) केतन मोळक (माण)
माती विभाग
मंदार ववले(भरे)सुशील चांदेरे (सुस)
Share