पुणे
Trending
मंदार स्वामी येनपुरे यांच्या पसायदान पुस्तकाचे प्रकाशन, मंदार स्वामीच्या मुळशीतील वेदांत कार्याचे केले साधुसंतांनी कौतुक

महावार्ता न्यूज: वारकरी सांप्रदायातील भीष्म पितामह म्हणुन ओळखल्या जाणा-या शांतीब्रह्म श्री कुर्हेकर बाबांच्या शुभ हस्ते आचार्य मंदार स्वामी येनपुरे यांच्या पसायदान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार आळंदी येथे पार पडला. या सोबतच स्वामींच्या ऑनलाईन वेदांत वर्गाच्या यशवंत साधकांना प्रमाणपत्र प्रदान सोहळा देखील पार पडला. याप्रसंगी मंदार स्वामीच्या मुळशीतील वेदांत कार्याचे साधुसंतांनी, शिष्यांनी कौतुक केले.
मुळशी तालुक्यातील किर्तनकार हभप राजेंद्र महाराज दहिभाते, नवल महाराज, चैतन्यगिरी महाराज, संघाचे हेमंतराव हरहरे, मुळशी तालुक्याचे संघाचे संघचालक अप्पा चोंधे, आंतरराष्ट्रीय पत्रकार संजय दुधाणे, हभप माझिरे महाराज, खराबी महाराज, ढगे महाराज असा मुळशी तालुक्यातील वारकरी सांप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शांती ब्रह्म हभप श्री कुर्हेकर बाबा यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले व बाबांनी ग्रंथास व स्वामीजींच्या कार्यास शुभाशिर्वाद दिले. आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त, अर्थतज्ञ किर्तनकार हभप श्री अजय टिळक यांनी देखील ग्रंथाचा वेगळेपणा काय आहे हे सांगत पसायदान कसे विश्वात्मक व विश्वशांतीची जगातील सर्वोत्तम प्रार्थना आहे हे सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हभप श्री पडवळ महाराज यांनी केले. तदनंतर ऑनलाईन अभ्यासक्रम का तसेच सतविचारांच्या प्रसारासाठी सोशल मीडीयाचा प्रभावी वापर म्हणजे नक्की काय या विषयी हेमंत ववले यांनी माहिती दिली. स्वामीजींच्या काही शिष्यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वामीजींचे हे पुस्तक ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Share