महावार्ता दिवाळी 2021
Trending
ऐतिहासिक मुळशीतील चार खोरी, मोसे-मुठा-पौड-पवन मावळ
उमेश दत्तात्रय वैद्य (पवार औषधराव)

महावार्ता दिवाळी 2021
आज आपण ज्यास मुळशी तालुका म्हणतो, त्या तालुक्याच्या सीमा आपणास आज माहित आहेत. पण पुर्वी मुळशी तालुका म्हणुन असे काही नव्हते. या संपुर्ण प्रदेशाची विभागणी पुर्वी चार खो-यांत केली. ही चारही खोरी आत्ताच्या मुळशी तालुक्यातील आहेत.
आताच्या मुळशी तालुक्याचे शिवकाळात चार भाग पडतात
1. मोसे खोरे – हे मोसे खोरे मोशी नदीच्या खोर्यात वसले आहे. हीच मोसे नदी मोसे खोर्यातच पुढे, डावजे या गावानजिक मुठा नदीस मिळते..
या भागातील गावांची संख्या होती 71 व खो-याचे मुख्य गाव होते मोसे बुद्रुक हे गाव. शिवरायांच्या बाल सवंगड्यांमधील, वयोवृध्द बाल म्हणजे बाजी पासलकर हे त्याकाळातील, या खो-याचे सामरिक शक्ति जोपासण्यासाठी नेमलेले अधिकारी होत. मोसे खोर्याची देशमुखी पासलकर घराण्याकडे होती अन त्यांचा किताब होता यशवंतराव. आज ह्या खोर्यामधली काही गाव मुळशी तालुक्यात येतात तर काही गावे वेल्ह्यात मोडतात. आत्ताच्या वेल्ह्यातील मोहरी हे गाव, जिथ पासुन रायगडाला जाण्यासाठी घाटवाटा आहेत, हे गाव पुर्वी मोसे खो-यात होते. कुंभाघाट, कावल्या-बावल्या खिंड, कावल्या घाट, देव घाट हे कोकणात उतरण्यासाठीचे मार्ग या खो-यातुनच होते.
2. मुठा खोरे – हे मुठा नदीच्या उगमापासून सुरु होऊन अगदी पिरंगुट पर्यंत पसरले होते. उरावडे या गावास पुर्वी ऊरुदुर्ग म्हणत. कासारांबोली (त्या काळातील आंबवली) देखील याच खो-यात होती मुलकी व्यवस्थेसाठी.मुठा नदी पुढे मोसे खोर्यातुन व् कर्यात मावळातून वाहत जाते आणी पुणे परगण्याच्या हवेली तरफेत मुळा नदीस मिळते.ङ्गमुठा खोर्यातील गावाची संख्या 19 होती . मुठा खोर्यात एकही किल्ला नाही. पण ऊरुदुर्ग म्हणजेच उरावडे येथील पोतणीस वाडा भुईकोट किल्ल्यासारखाच मानला जायचा. मुठा खोर्याचे देशमुखी मारणे घराण्याकडे होती . अन मारणे घराण्याला किताब होता ’गंभीरराव’
3. पौड खोरे – मुळा नदीच्या उगमा पासून वसलेल्या गावांपासुन अंबडवेट या गावापर्यंत हे खोरे पसरलेले होते. कैलासगड, घनगड, कोरीगड असे किल्ले या खो-यात होते. यातील गावांची संख्या 82 होती. ह्या खोर्याचे मुख्य ठिकाण होत पौड गाव तर देशमुखी होती ढमाल्यांकडे. ढमाल्यांना राऊतराव ही पदवी दिली होती. या खोर्यातली आताची सगळी गाव आत्ताच्या मुळशी तालुक्यातच आहे. या खो-यतुन कोकणात उतरण्यासाठी पुर्वी एकुण पाच घाट होते.

4. पवन मावळ – पवन मावळ पवना नदीच्या खोर्यात वसले आहे. पवन मावळाच्या दोन तरफा होत्या. ङ्गत्यापैकी शिंदे तरफेची (म्हणजे तिकोणा किल्ल्याच्या पश्चिमेकडील प्रदेश शिळीम गावापर्यंत) देशमुखी शिंदे यांचे कडे होती तिच्यात 37 गावे होती तर घारे तरफेची (म्हणजे तिकोणा किल्ल्याच्या पुर्वेक्डील भाग) देशमुखी ही घारे घराण्याकडे होती. या तर्फेत 43 गावे होती.
पवन मावळची देशमुखी दोन घराण्यांकडे होती. एक शिंदे व दुसरे घारे. यातील घारे देशमुख यांना भोपतराव हा किताब होता.या खो-यातील काही गाव आज मुळशी तालुक्यात आहे व काही गावे मावळ तालुक्यात आहेत.
यशिवकाळा नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतरचा दहा वीस वर्षा चा कालखंड हा मोठा कठीण होता. पण यावेळी महाराष्ट्र मंडळाने जी एकी, जी चिकाटी, जे रणंगाजित्व व मुत्सद्दीपण दाखवले त्या मुळे महाराष्ट्रीय व मराठयांचा दारारा जिकडे तिकडे बसला. आणि हि नावे कायमची अतुलनीय होऊन बसली.ङ्गङ्गह्या काळातील मुळशी पेट्यातील अनेक पुरुषांच्या कामगिरी विस्तारपूर्वक सांगण्याचा मोह आवरून पराक्रम गाजवलेली काही घराणी म्हणजे ढमाले देशमुख, अंबावण्याचे नाईक दळवी, शिरवली चे पंचहजारी फाटक, वळणे गावचे आदटराव दिघे जगदेवराव दिघे प्रभू तसेच सरनौबत निसंगराव दिघे, अवळसकर साठे, शेडाणी व अवळस येथील वैद्य, दारवलीचे नाईक बलकवडे, वडुस्तचे राजेशिर्के, शेडाणी चे मोकासदार खरे इत्यादी घराण्यांतील कित्येक पुरुषांनीं जीवाची पर्वा न करता तरवार गाजवली व शत्रूस ठेचून काढले.तसेच या घराण्यातील कित्येक नरश्रेष्ठीनीं रणसंग्रामात स्वतःचा बळी देऊन महाराष्ट्र धर्माचे परीपालन व सरंक्षण करून ईश्वरास जवळ केलं.
Share