महावार्ता दिवाळी 2021
Trending
मुळशी धरणातील प्राचीन ठेवा – शेडाणीतील मारूती – गणेश
उमेश दत्तात्रय वैद्य

महावार्ता दिवाळी विशेषांक 2021
मुळशी धरणात असणारा सगळाच ठेवा काळाच्या ओघात लुप्त झाला नाही. मावळ मातीचा अभेद्य वारसा त्या ठेव्याने अजून तरी जपला आहे. अधून मधून आपलं अस्तित्व तो पाण्या बाहेर येऊन दाखवत असतो.असच एक पहात रहावा असा निसर्गरम्य ठेवा शेडाणी गावात आहे.
पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात घडवलेला साधारण सहा फूट उंचीच्या एकाच दगडात मारुती अन गणपती असा एकत्रित कोरला आहे. गणपती साधारण आहे. मारुती मात्र उत्तम घडवला आहे. मारुतीच्या डाव्या पायाखाली शनी आहे. हातात कट्यार आहे.
मंदिराचा चौथरा अजून तसच दिसून येत. त्यावरून बांधकाम फार मोठं असेल असं दिसत. कारण मंदिरा समोर असणारा जोत्याचा खांब आजहि त्याच्या मागच्या भव्य अस्तित्वाची साक्ष देत उभा आहे. या मंदिराला बांधताना शुषक सांधा या पद्धतीचा वापर केला असावा. दगड एकमेकांना खाचेत घालून अश्या प्रकारचे बांधकाम केलं जात. (म्हणजे बांधकाम करताना चुना किंवा दुसरा कोणताही पदार्थ न वापरता दगड एकमेकांना सांधेत आडकवले जातात.)
मंदिर परिसरात मंदिराच्या निखाळून पडलेल्या शिळा व दगडी अवशेष यावरून आपल्याला हा अंदाज काढता येतो. हे मंदिर गावाबाहेर असावं. कारण त्या काळच्या कुंभार वेस वरून पुढं आले की हे मंदिर लागत. पूर्वी मावळात बहुतांश वेशीवर मारूतराया पुजला जायचा.

हा अमूल्य ठेवा बारामाही पाहता येत नाही. साधारण धरणातील पाणी कमी झालं की तो पाहता येतो. साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या नंतर ते जूनच्या पहिल्या पाहिल्या आठवड्या पर्यंत हा ऐतिहासिक ठेवा पाहता येतो. आज मंदिर राहील नाही. पण त्याच्या भव्यतेच मागच अस्तित्व आज घडीला अवशेषांच्या रुपात पाहता येत. हे सगळं ह्या पिढीने संवर्धन केलं नाही तर काळाच्या ओघात हे लुप्त होईल.
Share